Ashwin-Team-India
Ashwin-Team-India 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG: चार वर्षांनी मिळालेल्या संधीचं अश्विनने केलं सोनं

विराज भागवत

अश्विनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा | Trending on Social Media

IND vs AFG, T20 World Cup 2021: तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्ताच्या फलंदाजांची टीम इंडियाने धुलाई केली. विराटने टॉस हारल्यानंतर अफगाणिस्तानने भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांची दमदार अर्धशतके ठोकली. त्यानंतर मधल्या फळीनेही तगडी फटकेबाजी केली. त्यांच्या जोरावरच भारतीय संघाने २० षटकात २१० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारताकडून गोलंदाजी करताना चार वर्षांनी संघात स्थान मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीची सोशल मीडियावरही वाहवा झाली.

भारतीय संघात आज रविचंद्रन अश्विनला युवा वरूण चक्रवर्तीच्या जागी स्थान देण्यात आले. पहिल्या दोन सामन्यात वरूणला एकही विकेट घेता आली नव्हती. पण अश्विनने मात्र आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अश्विन ९ जुलै २०१७ मध्ये जमैका येथे विंडिजविरूद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला आज संधी मिळाली. त्याचा त्याने सुयोग्य वापर केला. अश्विनने आपल्या चार षटकांत केवळ १४ धावा दिल्या आणि २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

अश्विनच्या गोलंदाजीवर चाहते खुश झाले. ट्विटरवर अश्विन ट्रेंडिंग टॉपिक होता. त्याचे अनेकांनी कौतुक केले.

दरम्यान, भारतीय संघाने सलामीवीर रोहित शर्मा (७४) आणि लोकेश राहुल (६९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १४० धावांची सलामी दिली. त्यानंतर हार्दिक पांड्या (३५*) आणि ऋषभ पंत (२७*) यांच्यात नाबाद ६३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने २१० धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान अफगाणिस्तानला झेपले नाही. करीम जनतच्या नाबाद ४२ धावा आणि कर्णधार मोहम्मद नाबीच्या ३५ धावांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने २० षटकात ७ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे भारतीय संघाला ६६ धावांनी मोठा विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT