Rahul Dravid | Ajit Agarkar Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rahul Dravid: अमेरिकेत आंबेडकरांच्या विद्यापीठात पोहचले द्रविड आणि आगरकर, पुतळ्याला केले अभिवादन

Rahul Dravid and Ajit Agarkar: टी20 वर्ल्ड कपदरम्यान राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांनी न्युयॉर्कमधील कोलंबिया युनिवर्सिटीला भेट दिली होती.

Pranali Kodre

Rahul Dravid and Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी२० वर्ल्ड कप २०२४ साठी अमेरिकेला गेलेला आहे. भारताचे सुरुवातीचे सामने न्युयॉर्कमध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघ सध्या न्युयॉर्कमध्ये थांबलेला आहे. याचदरम्यान एक फोटो व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी कोलंबिया युनिवर्सिटीला भेट दिल्याचे दिसत असून तिथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहत फोटो काढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हे फोटो एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर विशाल मिश्रा नावाच्या युझरने पोस्ट केले असून त्यात त्याने लिहिले आहे की द्रविड आणि आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया युनिवर्सिटीमध्ये अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया युनिवर्सिटीमधून शिक्षण घेतले असून येथूनच त्यांनी पीएचडीचे शिक्षणही पूर्ण केले होते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सध्या अजित आगरकरही टी२० वर्ल्ड कपदरम्यान न्युयॉर्कमध्ये आलेला आहे. तसेच द्रविडसाठी यंदाची टी२० वर्ल्ड कप स्पर्धा ही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे. त्याचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे.

यानंतर त्याने पुन्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अर्ज केलेला नसल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता जून २०२४ नंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्जही मागवले होते. 27 मे पर्यंत हे अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे आता लवकरच बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाची घोषणा करेल.

सध्या भारतीय प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नाव सर्वाधित चर्चेत आहे. पण अद्याप याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT