rashid-khan 
क्रिकेट वर्ल्ड कप

"मी असं कधी बोललोच नाही"; राशिद खानने मारली पलटी?

विराज भागवत

वाचा, नक्की काय आहे प्रकरण

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान हा IPL मध्ये चर्चेचा विषय ठरला होता. २०१७नंतर राशिद खान आपल्या खेळावर लक्ष देत कामगिरीत सुधारणा केली, पण यंदाच्या IPL मध्ये त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. युएईमध्ये IPL स्पर्धा झाली होती. तेथेच आता टी२० वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेत राशिद कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तशातच, राशिद खानने स्वत:बद्दल चर्चेत असलेल्या एका वक्तव्याबाबत खुलासा केला.

कोरोना काळात राशिद खानबद्दलचे एक वक्तव्य प्रसिद्ध झाले होते. 'जेव्हा अफगाणिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावेल त्यावेळीच मी लग्न करेन', असं वक्तव्य राशिद खानने केल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केली होता. याबाबत 'एएफपी'शी बोलताना राशिद खानने एक महत्त्वाचा खुलासा केला. "मी स्वत:च आश्चर्यचकित झालो होतो ज्यावेळी मला समजलं की माझ्या तोंडी असं वाक्य असल्याचा दावा केला जातोय. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की अफगाणिस्तानने विश्वचषक जिंकला की मी लग्न करेन असं मी कधीच म्हटलं नव्हतं. मी असं म्हटलं होतं की आगामी काळात ३ वर्ल्ड कप स्पर्धा येत आहेत. २०२१ आणि २०२२ चा टी२० विश्वचषक आणि २०२३चा वन डे वर्ल्ड कप अशा तीन बड्या स्पर्धा रंगणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत लग्नाचा विचार करण्यापेक्षा मी स्वत:चे लक्ष क्रिकेटवर केंद्रीत करेन", असं स्पष्टीकरण राशिद खान याने दिलं.

Rashid khan

मी IPL दरम्यान एक गोष्ट पाहिली. युएईमधील IPL स्पर्धेचे जे सामने झाले त्यात चेंडू टप्पा पडल्यावर फारसा स्पिन होत नव्हता. खेळपट्टीचा पोत उत्कृष्ट होता, पण चेंडूला अपेक्षित फिरकी प्राप्त होत नव्हती. पण मला असं वाटतं की या खेळपट्ट्यांवर जितका जास्त खेळ होईल तितकी खेळपट्टी फिरकीसाठी पोषक ठरेल. पण असं असलं तरी एक बाब लक्षात घ्यायला हवी की हे टी२० क्रिकेट आहे. त्यामुळे सामन्यांचा अंदाज बांधणं कठीण आहे", असंही राशिद खान याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

Pension Service : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?

SCROLL FOR NEXT