rashid khan 
क्रिकेट वर्ल्ड कप

कामगिरी सुधारण्यासाठी काय केलं? राशिद खानने दिलं मजेशीर उत्तर

विराज भागवत

राशिद खान गेल्या २-३ वर्षातील सर्वात प्रभावशाली फिरकी गोलंदाज

T20 World Cup: आपल्या देशावर परकीय आक्रमण होत असताना आणि संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात जात असताना अफगाणिस्तानचे काही खेळाडू परदेशात टी२० स्पर्धा खेळत होते. आपल्या देशावर संकट ओढवल्यानंतरही ते खेळाडू डगमगले नाही. गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसते आहे. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तू काय केलंस? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावेळी एक मजेशीर उत्तर दिलं.

अफगाणिस्तानचा प्रतिभावान फिरकीपटू राशिद खान म्हणाला, "२०१७ च्या आधी जेव्हा मी IPL खेळत होतो त्यावेळी माझ्या कामगिरीत अपेक्षित सातत्य नव्हतं. त्याचं कारण होतं माझी तंदुरूस्ती. माझा फिटनेस हा माझ्या खेळात अडथळा ठरत होता. एक-दोन सामने खेळले की पुढचे दोन सामने खेळण्यासाठी माझं शरीर तयारच होत नसे. त्यामुळे माझी कामगिरी अव्वल दर्जाची होत नव्हती. पण २०१७ नंतर मी इतर खेळाडूंकडे लक्ष द्यायचो. ते त्यांच्या फिटनेसची कशी काळजी घेतात हे मी पाहायचो."

Rashid Khan

"मी २०१७च्या आधी जिमला जाणं वगैरे गोष्टींचा कंटाळा करायचो. अफगाणिस्तानसारख्या देशात फिटनेस आणि इतर गोष्टींबद्दल तितकी जागरूकता नाही. त्यामुळे फिटनेसचं महत्त्व किती असतं हे कळत नव्हतं. पण जसंजसं मी क्रिकेट खेळाडू लागलो तसंतसं मी फिटनेसचा विचार करू लागलो. कामगिरी सुधारण्यासाठी मी बिर्याणी खाणं सोडलं असं मी म्हणू शकतो. मी आधी बिर्याणी, पाव, गोडधोड असं सगळं खात असायचो. पण आता मात्र मी बार्बेक्यू किंवा ग्रिल केलेलं अन्न आणि सॅलड खातो. मी हे मनाशी ठरवलं होतं की मला जर चांगली कामगिरी करायची असेल तर मला तंदुरूस्त व्हावेच लागेल", असं राशिदने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT