क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: अफ्रिदी, गेल नंतर आता 'या' एलिट लिस्टमध्ये रोहित शर्मा! ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेल यांचा समावेश असलेल्या एलिट यादीत आता तिसरा खेळाडू म्हणून रोहित शर्माचा समावेश झाला आहे. हा मोठा टप्पा गाठणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात रोहित शर्मानं हा आणखी एक मोठा टप्पा गाठला. (Rohit Sharma Becomes First Indian to Achieve Sixes Elite List Joins with Chris Gayle Shahid Afridi)

अन् ३०० षटकार पूर्ण

रोहितनं अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी शतक झळकावताना या नव्या विक्रमाकडं वाटचाल सुरु केली होती. त्यानंतर आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला.

रोहितनं हरिस रौफला जबरदस्त फटका मारून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले आणि एक मोठा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय आणि शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेलनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत शाहिद आफ्रिदी आघाडीवर आहे, तर गेल दुसऱ्या स्थानावर आहे. (Latest Marathi News)

धोनी दुसऱ्या स्थानावर

दरम्यान, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत 229 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने 200 षटकारही मारलेले नाहीत. त्यामुळं ३०० षटकारांच्या यादीत रोहित शर्माचं स्थान अढळ राहणार आहे. (Marathi Tajya Batmya)

वनडेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार:

  1. शाहिद आफ्रिदी : ३५१–३६९ डाव

  2. ख्रिस गेल : ३३१–२९४ डाव

  3. रोहित शर्मा : ३००–२४६ डाव

रोहितचा नवा विक्रम

आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, रोहित शर्मानं आणखी एक अर्धशतक नोंदवलं आणि त्यानं अवघ्या 36 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. शुभमन गिल आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही, ते मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. परंतु रोहितच्या जलद प्रयत्नानं भारतासाठी विजय निश्चित केला.

आजचा सामना कसा झाला?

तत्पूर्वी, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात दमदार म्हणजेच 155-2 अशी झालेली असताना त्यांचा पुढील डाव 191 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी दोन विकेट्स घेतल्या.

हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली, तर रिझवानने मेन इन ग्रीनसाठी विस्मरणीय फलंदाजी करताना ४९ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT