Rohit Sharma esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma : तीन-चार वर्षे कोणत्या परिस्थितीतून गेलोय... वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितनं मन केलं मोकळं

Rohit Sharma T20 World Cup 2024 : रोहित शर्माने भारताच्या विजयामागे तीन चार वर्षे काम केल्याचे सांगितले आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20 World Cup 2024 : भारताने अखेर 13 वर्षाचा वर्ल्डकपचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्या टी 20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. रोहितसाठी हा विजय खूप खास आहे. कारण सात महिन्यापूर्वीच भारताने मायदेशात वनडे वर्ल्डकप हरला होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे रोहितचे स्वप्न तोडले होते. मात्र भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकून देशवासियांच्या जखमेवर फुंकर मारली.

या विजयानंतर रोहित शर्माने भावूक होत प्रतिक्रिया दिली. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहितचे डोळे पाणावले. कंठ दाटून आला. रोहित म्हणाला, 'आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षात कोणत्या परिस्थितीतून गेलोय हे सांगणं खूप कठिण आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या या विजयासाठी आम्ही वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणून खूप कष्ट उपसले आहेत. आम्ही आज हे आज करून दाखवलं आहे असं नाही यामागे 3 ते 4 महिन्याची मेहनत आहे.' रोहित शर्मा पुढे म्हणला की, 'आज आम्हाला आमच्या मनासारखा रिझल्ट मिळाला आहे. आम्ही गेल्या काही वर्षापासून खूप हाय प्रेशर सामने खेळत आलो आहे. मात्र आम्हाला मनासारखा रिझल्ट मिळाला नाही. मात्र आमच्या खेळाडूंना काय करायचं आहे हे माहिती होतं.

आजचा सामना हा ज्यावेळी परिस्थिती विपरित असते त्यावेळी काय करणं गरजेचं असतं याच उत्तम उदाहरण आहे. आम्ही संघ म्हणून एकत्र राहिलो. सामना दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात जाणार असं वाटत असतानाही आम्ही धीर सोडला नाही.

संघ म्हणून आम्हाला वर्ल्डकप हवा होता. अशी स्पर्धा जिंकण्यासाठी पडद्यामागे खूप काम करावं लागतं. अनेकांचे क्रिकेटिंग माईंट कामाला येतात. मला आमच्या संघाचा खूप अभिमान आहे. एकमेकांवरचा विश्वास खूप महत्वाचा असतो.'

याची सुरूवात संघ व्यवस्थापन, कोच, कॅप्टन आणि खेळाडूंपासू होते. संपूर्ण स्पर्धेत आम्ही दमदार कामगिरी केली. विराटच्या फॉर्मबाबत मला काय कोणालाच शंका नव्हती. आम्हाला त्याची गुणवत्ता माहिती होती. तो या खेळात गेल्या 15 वर्षापासून सर्वोच्च योगदान देत आहे. मोठ्या सामन्यात मोठे प्लेअरच उभे राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT