Rohit-Sharma 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: रोहित शर्माबद्दल केविन पीटरसनची मोठी भविष्यवाणी

सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेबाबत केलं विधान | Kevin Pietersen Predictions

विराज भागवत

सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेबाबत केलं विधान | Kevin Pietersen Predictions

Rohit Sharma in T20 World Cup: पाकिस्तानकडून (Pakistan) मोठा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ (Team India) या रविवारी न्यूझीलंडशी (New Zealand) खेळणार आहे. न्यूझीलंड संघाचा पहिला सामना पाकिस्तान झाला असून तेदेखील पराभूत झाले. त्यामुळे भारत-न्यूझीलंड सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा IPL मध्ये चांगल्या फॉर्मात होता. पण पाकिस्तानविरूद्ध तो पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. भोपळाही न फोडता आलेल्या रोहित शर्माबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने एक भविष्यवाणी केली.

Rohit Sharma

केविन पीटरसन याने IPL मध्ये रोहितचा खेळ पाहिला. त्यामुळेच त्याने रोहितबद्दल महत्त्वाचं विधान केलं. रोहित शर्मा हा कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा खेळाडू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तो ज्या प्रकारे खेळतो आहे, त्यावरून तो टी२० वर्ल्ड कपमध्ये फलंदाजीत अयशस्वी ठरेल असं वाटत नाही. डावाच्या सुरूवातीला फलंदाजी करणं हे खूपच मनोरंजक असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की रोहित माझं म्हणणं खरं करेल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल, अशी भविष्यवाणी पीटरसन याने केली.

Shaheen Afridi

"शाहीन शाह आफ्रिदी हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या भरवशावरच मी म्हणू शकतो की पाकिस्तानचा संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. नव्या चेंडूचा तो स्विंगसाठी खूप सुंदर वापर करतो. मला असं वाटतं की तो प्रत्येक संघाचे सलामीवीर स्वस्तात माघारी पाठवेल आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी टिपेल", असं पीटरसन म्हणाला. तसेच, IPL च्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलबद्दलही पीटरसनने मत मांडलं. मॅक्सवेल हा यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावेल. त्याने युएईच्या मैदानांवर खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फायदा करून घेत तो संघाला यशस्वी करेल, असं केविन पीटरसन म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT