Rohit Sharma Hardik Pandya  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma : ... अन् रोहितनं हार्दिकला उचलूनच घेतलं! आयपीएलमधील दुरावा वर्ल्डकपध्ये संपला

Rohit Sharma & Hardik Pandya: भारताचा कर्णधार आणि उपकर्णधार भारत - पाक सामन्यात एकसंधपणा दाखवला.

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 : भारताने पाकिस्तानचा तोंडचा घास पळवत टी 20 वर्ल्डकप 2024 मधील आपला सलग दुसरा विजय प्राप्त केला. पाकिस्तानने भारताला 119 धावात ऑल आऊट केलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार मारा करत पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावात रोखलं.

जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजा करत 14 धावात 3 विकेट्स घेतल्या. त्याने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमदला बाद केले. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने देखील दोन विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, आयपीएलवेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू होती. मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला कॅप्टन केलं होतं.

मात्र वर्ल्डकपमध्ये या दोन्ही खेळाडूंमध्ये एक वेगळंच बाँडिग पाहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने उपकर्णधार हार्दिक पांड्याला आनंदाने मिठी मारत उचलूनच घेतलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्डकप भविष्याबाबत बोलायचं झालं तर युएसए आणि भारताकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता पाकिस्तानला कॅनडा आणि आयर्लंडविरूद्धचा सामना मोठ्या मार्जीनने जिंकावे लागणार आहे. याचबरोबर अमेरिका भारत आणि आयर्लंडकडून मोठ्या मार्जीनने पराभूत व्हावी अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

या परिस्थितीत देखील दोन्ही संघ समान चार गुणांवर येतील अन् त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश हा नेट रनरेटवर अवलंबून असेल.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

SCROLL FOR NEXT