Rohiti Sharma with mami jyoti iyer sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : निवृत्तीच्या निर्णयाने रोहित शर्माची मामी झाली दुःखी

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही अचानक टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही अचानक टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींची तर निराशा झालीच, शिवाय रोहितच्या नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला. रोहितच्या निर्णयामुळे नागपुरात राहणाऱ्या त्याच्या मामी दुःखी झाल्या आहेत.

भारताने शनिवारी अटीतटीच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकला. स्पर्धेतील भारताचे एकूणच प्रदर्शन आणि निवृत्तीच्या निर्णयावर रामेश्‍वरी परिसरातील द्वारकापुरी (पार्वतीनगर) येथे राहणारी रोहितची मामी ज्योती धनंजय अय्यर यांनी मीडियाशी संवाद साधला.

आपल्या भावना व्यक्त करताना ज्योती म्हणाल्या, वर्ल्डकप फायनलसह भारताचे सर्वच सामने आम्ही घरी एकत्र बसून टीव्हीवर पाहिले. या स्पर्धेत भारतीय संघाने तर चांगली कामगिरी केलीच, शिवाय रोहितचे नेतृत्वही प्रभावी ठरले. अंतिम सामना खरोखरच अटीतटीचा व रोमहर्षक झाला. एकवेळा तर आपण सामना हारतो की काय, असे वाटत होते. मात्र रोहितने शांत डोक्याने नेतृत्व करत विजयश्री खेचून आणली.

सामन्यानंतर रोहितच्या निवृत्तीची बातमी ऐकल्यावर ज्योती यांना खूप दुःख झाले. त्या म्हणाल्या, रोहित अनुभवी व फिट असून, फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे तो अजूनही दोन-तीन वर्षे टी-२० सामने खेळू शकतो, असे आम्हाला वाटते. घाईघाईत निवृत्तीची घोषणा करून त्याने चूक केली. त्याने इतक्या लवकर निवृत्त व्हायला नको होते, असे मला वाटते.

वेस्ट इंडिजहून मायदेशी परतल्यानंतर या विषयावर त्याच्याशी अवश्य बोलेल. भारतातील युवा क्रिकेटपटूंना संधी मिळावी, म्हणूनच रोहितने हा निर्णय घेतलेला आहे. असे असेल तर त्याचा हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मात्र त्याचवेळी कसोटी व वनडे खेळणार असल्याने त्या समाधानी आहे.

रोहितचा जन्म नागपूरचा

उल्लेखनीय म्हणजे, रोहितचा जन्म नागपुरातील मेडिकल चौकस्थित बन्सोड नर्सिंग होममध्ये झाला होता. त्यामुळे रोहितचे या शहराशी खास ऋणानुबंध आहेत. रोहितही नागपूरला कधी विसरला नाही. नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना असताना अनेकवेळा तो वृद्ध आजी व मामा-मामीच्या भेटीला गेलेला आहे. आजी राजलक्ष्मी यांनी लहानपणी त्याला अंगाखांद्यावर खेळविले आहे. रोहितला मामीच्या हातचे गरमागरम कांदेपोहे व ‘स्पेशल’ चहा खूप आवडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT