Ruben Trumpelmann First Two Ball Wicket Marathi News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ruben Trumpelmann : बुमराह-शमीला जे जमले नाही ते नामिबियाच्या पठ्ठ्याने केलं! टी-20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

T20 World Cup 2024 Namibia vs Oman : नामिबियाच्या खेळाडूने टी-20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास! पहिल्याच ओव्हरमध्ये केली मोठी कामगिरी

Kiran Mahanavar

Ruben Trumpelmann First Two Ball Wicket : सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024मध्ये ओमान आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात नामिबियाच्या गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमॅनने अप्रतिम कामगिरी केली आहे.

ट्रम्पेलमॅनने एक अशी कामगिरी केली आहे जी टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला देखील करता आली नाही. त्याने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर एक मोठा विक्रम केला आहे, जो आजच्या आधी T20I मध्ये कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही.

नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमॅनने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ओमानच्या कश्यप प्रजापतीला आणि यानंतर दुसऱ्या चेंडूवर ओमानचा कर्णधार आकिब इलियासला आऊट केले. टी-20 सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेणारा रुबेन ट्रम्पेलमॅन हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यांच्यापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती. यानंतर रुबेन ट्रम्पेलमॅनने ओमानविरुद्ध नसीम कुशीची विकेटही घेतली.

रुबेन ट्रम्पेलमॅनने 2021 मध्ये नामिबियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने नामिबिया संघासाठी 28 टी-20 सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या आहेत. डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यासाठी तो ओळखला जातो. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 76 विकेट्स आहेत.

नामिबियाचा संघ यापूर्वी टी-20 वर्ल्ड कपच्या दोन आवृत्त्यांमध्ये सहभागी झाला होता. या संघाने 2021 आणि 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला. टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी नामिबियाचा संघ ब गटात आहे. या गटात नामिबियाशिवाय ओमान, स्कॉटलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत.

T20 विश्वचषकासाठी नामिबियाचा संघ : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जॅन ग्रीन, मायकेल व्हॅन लिंजन, डिलन लीच्टर, रुबेन ट्रम्पेलमॅन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, टांगेनी लुंगामेनी, निको डेव्हलिन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, जेपी कोट्झ, डेव्हिड विसे, बर्नार्ड स्कॉल्ट्ज, मालन क्रुगर, पीडी ब्लिग्नॉट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT