West Indies VS South Africa T20 World Cup 2024 SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

WI vs SA : 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेसाठी पाऊस ठरला वरदान! थाटात सेमी-फायनलमध्ये मारली एन्ट्री; वेस्ट इंडिजचे भंगले स्वप्न

West Indies VS South Africa T20 World Cup 2024: यजमान वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांचा तीन विकेट राखून पराभव केला.

Kiran Mahanavar

South Africa beat West Indies by 3 wickets (DLS method) : यजमान वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांचा तीन विकेट राखून पराभव केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 135 धावा केल्या. पण पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला 123 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या या सामन्‍यात अखेर आफ्रिकेने विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. दक्षिण आफ्रिकेपूर्वी इंग्लंडचा संघही उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन षटकांनंतर 2 बाद 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवावा लागला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 17 षटकांत 123 धावा करण्याचे नवे लक्ष्य मिळाले आहे. पावसामुळे तीन षटके कमी करावी लागली.

दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक 29 धावा केल्या. हेनरिक क्लासेन आणि एडन मॅक्रॅम यांनीही चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आले नाही. क्लासेनने 22 आणि मॅक्रॅमने 18 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 135 धावा केल्या. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. साई होप खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर निकोलस पुरनही 1 धावा काढून बाद झाला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ अडचणीत सापडलेला दिसत होता. यानंतर काईल मेयर्स आणि रोस्टन चेस यांनी काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला.

रोस्टन चेसने शामदार अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावा केल्या. 35 धावा केल्यानंतर मेयर्स शम्सीचा बळी ठरला. आंद्रे रसेलने 15 धावांचे योगदान दिले. अल्झारी जोसेफने 11 धावा केल्या. रोस्टन चेसच्या खेळीमुळेच वेस्ट इंडिजचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने 4 षटकांत 27 धावा देत तीन बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT