Rohit-Sharma-Virat-Kohli-Sunil-Gavaskar 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs NZ: "हा विराटने रोहितचा केलेला अपमान"; गावसकर भडकले...

सुनील गावसकरांनी न्यूझीलंड-भारत सामन्यावर केली सडकून टीका | Virat Kohli got slammed

विराज भागवत

सुनील गावसकरांनी न्यूझीलंड-भारत सामन्यावर केली सडकून टीका | Virat Kohli got slammed

IND vs NZ, T20 World Cup 2021: कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील सलग दुसरा सामना हारला. पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून सहज हरवले. भारतीय संघाने २० षटकात ११० धावा केल्या आणि न्यूझीलंडने हे आव्हान १४.३ षटकात सहज पार केले. भारताच्या संघावर पराभवानंतर बरीच टीका झाली. त्यातच, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या मुद्द्यावरून विराटला चांगलंच सुनावलं.

IND vs NZ

भारतीय संघात फलंदाजीत एक बदल करण्यात आला होता. सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असताना त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली होती. पण त्याला फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले आणि रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्यावरून सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Rohit-Sharma-vs-Trent-Boult

"इशान किशन हा नवा खेळाडू आहे. अशा खेळाडूला सलामीला पाठवणं आणि रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे रोहितचा अपमानच आहे. इशानसारखा खेळाडू चौथ्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि खेळाचा अंदाज घेऊन आक्रमक किंवा बचावात्मक खेळी करू शकतो. पण रोहितला अचानक तिसऱ्या क्रमांकाला पाठवणं बरोबर नाही. अशाने तुम्ही त्याला असा संदेश देत आहात की तुला ट्रेंट बोल्टच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करता येत नाही. मग असा संदेश दिल्यानंतर तो फलंदाजही काहीसा द्विधा मनस्थितीत पडतो", अशा शब्दात गावसकर यांनी आपली भूमिका मांडली.

Sunil-Gavaskar

"गेल्या अनेक महिन्यांपासून जो खेळाडू सलामीवीर म्हणून चांगली खेळी करण्यास सक्षम आहेत अशा खेळाडूला अशाप्रकारे फलंदाजीत खाली पाठवणं योग्य नाही. जर इशान किशनने चांगली कामगिरी केली असती आणि ७०-८० धावा केल्या असत्या, तर हा विषय आलाच नसता. पण त्याला फारशी चांगली खेळी करता आली नाही, त्यामुळे आता हा विषय चर्चेत येणारच. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं आणि स्वत: विराटने तिसऱ्या ऐवजी चौथ्या क्रमांकावर येणं हे न पटणारं होतं. आणि तशातच एका युवा खेळाडूला डाव सुरू करण्याची जबाबदारी देणं तर खूपच अनाकलनीय होतं", असंही गावसकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

SCROLL FOR NEXT