IND vs PAK Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: "पाकिस्तानच्या यशात टीम इंडियाचा वाटा", जाणून घ्या कसं?

मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानी संघाच्या अपराजित कामगिरीच्या रहस्याचा खुलासा केलाय.

सुशांत जाधव

युएईच्या मैदानात सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) पाकिस्तान क्रिकेट संघाने विशेष छाप सोडली. सुपर 12 मधील सर्वच्या सर्व सामने जिंकत त्यांनी सेमी फायनल गाठली आहे. गुरुवारी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीपूर्वी पाकिस्तान संघाचे फलंदाज सल्लागार मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानी संघाच्या अपराजित कामगिरीच्या रहस्याचा खुलासा केलाय. पाकिस्तानी संघाच्या यशात भारतीय कनेक्शन असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय.

पाकिस्तान संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला 10 विकेट्सनी पराभूत केले होते. वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानचा भारताविरुद्ध हा पहिला विजय होता. या विजयामुळेच पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यांनी अपराजित राहत सेमी फायनलमध्य धडक मारली, असे मॅथ्यू हेडन यांचे मत आहे.

पाकिस्तानने ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये पाच पैकी पाच सामने जिंकून दिमाखात सेमी फायनल गाठली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदाच्या वर्ल्ड कपचे ते प्रबळ दावेदारी सिद्ध करत आहेत. प्रचंड दबाव असताना बाबर आझमने जे नियंत्रण दाखवले ते लाजवाब असल्याचे मत बॅटिंग सल्लागार हेडन मॅथ्यू यांनी म्हटले आहे.

सेमी फायनलपूर्वी पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की. या स्पर्धेतील सर्वात आकर्षण होते ते म्हणजे दुबईच्या मैदानात खेळलेला भारताविरुद्धचा सलामीचा सामना. उद्या आम्ही याच मैदानात खेळणार आहे. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याची तुलना अ‍ॅशेस मालिकेशी केलीये. टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तान संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा होता. ते पुढे म्हणाले की, ट्रेनिंगसह अध्यात्मिकतेनं खेळाडू एकजुटीनं खेळले. त्याचाही संघास फायदा झाला, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT