Afghanistan  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : अफगाणिस्तानच्या गोलंदाजाकडून टीम इंडियाला वॉर्निंग

आम्ही टीम इंडियाला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदान उतरु

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या टीम इंडियाला आता अफगाणिस्तानचा गोलंदाजानं पराभवाचा इशारा देणारं धाडस करुन दाखवलंय. अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज हामिद हसन (Hamid Hassan) याने सेमी फायनलपर्यंत धडक मारण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवण्यासाठी आम्ही टीम इंडियाला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदान उतरु असे त्याने म्हटले आहे.

सुपर 12 मधील दुसऱ्या गटात अफगाणिस्तानच्या संघाने तीन सामन्यातील दोन विजयासह चार गुण कमावले आहेत. बुधवारी अबुधाबीच्या मैदानात अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. याशिवाय न्यूझीलंड विरुद्धही त्यांची एक लढत बाकी आहे. भारतीय संघ जर-तरच्या समीकरणात असताना पुढील दोन सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानला थेट सेमी फायनल गाठणयाची संधी आहे.

सामन्यापूर्वी हामिद हसन म्हणाला की, आम्ही टीम इंडियासोबतच्या लढतीकडे एक संधी म्हणून पाहत आहोत. सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर आम्ही त्यांना पराभूत करु शकतो. 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या जलदगती गोलंदाजाला भारतीय संगाच्या फ्लॉप टॉप आर्डरवरुनही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, लवकरात लवकर विकेट मिळवण्यासाठी खेळपट्टी कशी खेळते हे पाहावे लागेल. सामन्याआधीच यावर भाष्य करणं कठीण आहे. आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळू. फिरकीपटू असेल किंवा जलदगती गोलंदाज असेल संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न राहिल.

आम्ही स्पर्धेचा विचार न करता एका मॅचवर फोकस करत आहोत. सेमी फायनल हे आमचे लक्ष्य असले तरी यासाठी पुढील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानचा संघ मजबूत होत असून आम्ही कोणत्याही संघाला टक्कर देण्यास सक्षम असल्याचे त्याने बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT