England VS Australia T20 World Cup Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलिया 125 धावांत ऑल आउट!

कर्णधार अ‍ॅरोन फिंचने 49 चेंडूत केलेली 44 धावांची खेळी ऑस्ट्रेलियासाठी सर्वोच्च ठरली.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईच्या मैदानात सामना रंगला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या 125 धावांत आटोपले. इंग्लंडकडून क्रिस जार्डनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. क्रिस वोक्स, टायमल मिल्स यांनी प्रत्येकी 2 तर लिविंगस्टोन आणि अदिल राशिदला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

कर्णधार अ‍ॅरोन फिंचने 49 चेंडूत केलेली 44 धावांची खेळी ऑस्ट्रेलियासाठी सर्वोच्च ठरली. सलामीवीर डेविड वॉर्नर अवघी एक धाव करुन तंबूत परतला. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसला अदिल रशिदनं खातेही उघडू दिले नाही.

सुपर 12 मधील पहिल्या गटात दोन्ही संघानी पहिल्या दोन सामन्यात विजय नोंदवला आहे. या सामन्यातील विजयासह हॅटट्रिक नोंदवून सेमीफायनलची दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यांना निर्धारित 20 षटकात 10 गडी गमावून केवळ 125 धावांपर्यंत मजल मारता आली. टी-20 वर्ल्ड कपमधील त्यांची ही तिसरी निच्चांकी धावसंख्या आहे.

यापूर्वी 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने मिरपूरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला 86 धावांत आटोपले होते. 2012 मध्ये कोलंबो मैदानात पाकिस्तानच्या संघाने त्यांना 7 बाद 117 धावांत रोखले होते. तर इंग्लंडने या सामन्यात त्यांना 125 धावांत रोखले. जो संघ हा सामना जिंकेल तो या गटात अव्वलस्थानी जाईल. तीन विजयासह त्यांचे सेमीफायनलचे तिकीट जवळपास निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांना अतिरिक्त होण्याची धास्ती! सप्टेंबरअखेरच्या आधारव्हॅलिड पटसंख्येवर होणार संचमान्यता; शिक्षकांना वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी देण्याचाही निर्णय

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2025

अग्रलेख : शक्तिपरीक्षेचे रंग

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 सप्टेंबर 2025

माण तालुका हादरला! 'राणंदमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून'; शेतातच आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT