England South Africa Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC दक्षिण आफ्रिकेचा विजय; सेमी फायनलच्या शर्यतीत रंगत

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 विकेट्सने विजय नोंदवत सेमी फायनलच्या शर्यतीतील आपले स्थान भक्कम केले आहे.

सुशांत जाधव

ICC Mens T20 World Cup 2021 Points Table : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून आधीच बाद झालेल्या बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिकनं मोठा विजय नोंदवला आहे. कगिसो रबाडा आणि नॉर्तजे यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर आफ्रिकीने पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशचे कंबडे मोडले. बांगलादेशचा संघ 18.2 षटकात 84 धावांवर ऑल आउट झाला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 विकेट्सने विजय नोंदवत सेमी फायनलच्या शर्यतीतील आपले स्थान भक्कम केले आहे.

बांगलादेशने ठेवलेल्या 85 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर रिझा हॅड्रिक्स आणि क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तस्कीन अहमदने रिझा हॅड्रिग्सला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 5 चेंडूत 4 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ क्विंटन डी कॉकही 16 धावा करुन तंबूत परतला. मेहंदी हसनने त्याला बोल्ड केले. रस्सी वॅन डेर डूसन याने 22 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला मार्कम हजेरी लावून चालता झाला. कर्णधार तेम्बा बवुमाने 28 चेंडूत नाबाद 31 धावा करत डेविड मिलरच्या साथीनं संघाला विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर सेमीच्या शर्यतीत निर्माण झाले ट्विस्ट

सुपर 12 मधील पहिल्या गटात इंग्लंडने तीन 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा अखेरचा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण जमा होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचेही दोन सामने बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्याविरुद्ध भिडणार आहे. त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर त्यांच्याही खात्यात 8 गुण जमा होतील. सध्याच्या घडीला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या तीन संघातील दोन संघ सेमीसाठी पात्र ठरतील. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत असले तरी ऑस्ट्रेलियालाही संधी आहे. त्यामुळे सेमीसाठी चांगलीच ट्विस्ट निर्माण झाल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT