T20 World Cup 2024 Super 8 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Super 8 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदललं समीकरण, 20 पैकी 2 संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, तर 2 जणांची जागा पक्की

T20 World Cup 2024 Australia Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने नामिबियाला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Australia Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने नामिबियाला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. नामिबिया 72 धावांवर ऑल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकांत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले. आता ऑस्ट्रेलिया सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आता नामिबियाही सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

वर्ल्ड कपमधून 20 पैकी 2 संघ बाहेर

यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळत आहेत. स्पर्धेतील 24 सामने खेळले गेले आहेत. 24 सामन्यांनंतर 2 संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. प्रथम ओमानचा संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला. यानंतर नामिबिया आता सुपर-8 मधून बाहेर पडणारा दुसरा संघ बनला आहे.

सुपर-8 साठी 2 संघ पात्र

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 साठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवून पात्रता मिळवली होती. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तिन्ही सामने जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सध्या 6 गुण झाले आहेत. आता ऑस्ट्रेलिया हा नामिबियाला हरवून सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियानेही आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.

एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला 17 षटकांत अवघ्या 72 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा सामना एकतर्फी केला होता. कांगारू संघाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय हेझलवूड आणि स्टॉइनिसने २-२ विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

Leopard Attack : आईवडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले; गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा

Video: आईचं काळीज बघा.. शहीद मुलाला थंडी लागू नये म्हणून पुतळ्याला पांघरते ब्लँकेट; वृद्ध आईचा व्हिडीओ व्हायरल

Megablock: मुंबईकरांचे होणार मेगाहाल! रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे लोकलसेवा विस्कळीत, 'या' स्थानकांवरील थांबे बंद राहणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT