Aiden Markram Catch Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अन् तिथेच इंग्लंडने मॅच गमावली, पाहा द. आफ्रिकेच्या कर्णधाराने मागे पळत येत पकडलेला अविश्वसनीय कॅच

England vs South Africa: इंग्लंड-द. आफ्रिका यांच्यातील टी20 वर्ल्ड कपमधील सामना क्षेत्ररक्षकांनी गाजवला, या सामन्यादरम्यान झालेल्या शानदार क्षेत्ररक्षणाचे झलक पाहा.

Pranali Kodre

Aiden Markram Catch: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी (21 मे) इंग्लंडविरुद्ध 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात क्षेत्ररणाचा मोठा वाटा राहिला.

खरंतर हा सामना फलंदाजी आणि गोलंदाजी याबरोबरच क्षेत्ररक्षणासाठीही अनेकांच्या लक्षात राहिल. कारण या सामन्यात दोन्ही संघाकडून भन्नाट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन झाले. इंग्लंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक जॉस बटलर याने जितके चांगले यष्टीरक्षण केले, त्याच्या तोडीस तोड दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी शानदार झेल घेतले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी इंग्लंडला सुरुतीला मोठे धक्के दिले होते.

यावेळी रिझा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन आणि एन्रिच नॉर्किया यांनी शानदार झेलही घेतले. त्यामुळे एकावेळी इंग्लंड 4 बाद 61 धावा अशा स्थितीत होते.

मात्र, नंतर हॅरी ब्रुकने लियाम लिव्हिंगस्टोनला साथीला घेत आक्रमण केले. या दोघांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. हे दोघेही खेळत असताना इंग्लंड सहज विजय मिळवेल असं चित्र दिसत होतं.

मात्र 18 व्या षटकात लिव्हिंगस्टोनला रबाडाने ट्रिस्टन स्टब्सच्या हातून झेलबाद केले. पण त्यानंतरही तुफान खेळ करत असलेला ब्रुक मैदानात होता आणि त्याला साथ देण्यासाठी सॅम करन मैदानात आला होता. पण 19 व्या षटकात मार्को यान्सिनने 7 धावाच खर्च केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची विजयासाठी गजर होती.

अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्किया गोलंदाजी करत होता. त्याने पहिला चेंडू धीम्या गतीचा टाकला, त्यावर ब्रुकने मोठा फटका खेळला. पण त्यावेळी चेंडू सीमापार करणार नाही, याची काळजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने घेतली.

त्याने चेंडूवर नजर टिकवून ठेवत मिड-ऑफपासून मागे पळत जात सूर मारून अफलातून झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. त्याच्या या झेलामुळे ब्रुकला 37 चेंडूत 53 धावांवर माघारी परतावे लागले.

त्याचा हा झेल या सामन्यातील टर्निंग पाँइंट ठरला. कारण त्यानंतर इंग्लंड केवळ 6 धावा करू शकले आणि हा सामना दक्षिण आफ्रिकेने 7 धावांनी जिंकला.

इंग्लंड - दक्षिण आफ्रिका सामन्यातील शानदार क्षेत्ररक्षणाचे व्हिडिओ -

दरम्यान, तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने 38 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच डेव्हिड मिलरने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 163 धावा करता आल्या.

इंग्लंडकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोईन अली आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT