Jay Shah Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Jay Shah: जिंकलो रे! टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील विजयानंतर BCCI सचिवांचा स्टँडमध्ये जल्लोष, Video Viral

India vs Pakistan: भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध टी20 वर्ल्ड कपमध्ये रोमांचक विजय मिळवल्यानंतर स्टँडमध्ये असलेले बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जोरदार आनंद जल्लोष केला होता.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Pakistan: रविवारी (9 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा सलग दुसरा विजय ठरला.

दरम्यान, भारताच्या या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही जोरदार आनंद साजरा केला. जय शाह देखील या टी20 वर्ल्ड कपसाठी न्युयॉर्कला आलेले असून त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यासाठीही स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.

या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवताच स्टेडियमममध्ये भारतीय चाहत्यांनी जयघोष केला. याचवेळी स्टँडमध्ये बसलेल्या जय शाह यांनीही जोरदार आनंद साजरा केला. त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या, त्याचबरोबर सर्वांनाही जल्लोष करण्याचा इशारा करताना ते दिसत होते. या क्षणांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या.

भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्माने 13 धावा केल्या. या तिघांशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद अमीरने 2 विकेट्स घेतल्या, तर शाहिन आफ्रिदीला 1 विकेट घेतली.

त्यानंतर 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT