jay shah predication about world cup win esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Jay Shah World Cup: जय शाहने भविष्यवाणी केली होती अगदी तसच घडलं! रोहितने बार्बाडोसमध्ये गाडला झेंडा

jay shah predication about world cup win: वर्ल्ड कप पराभवानंतर जय शाह यांनी रोहितच्या कर्णधारपदावर कोणतेही स्टेटमेंट दिले नव्हते. त्यांच्या शांत राहण्याबद्दल चर्चा सुरू होती.

सकाळ वृत्तसेवा

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. यानिमित्ताने बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली असल्याची चर्चा सुरू आहे.

काय म्हणाले होते जय शाह ?

अहमदाबाद येथे 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभूत होऊन फक्त 7 महिने झाले आहेत. यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. शाह म्हणाले की, भारताने एकदिवसीय विश्वचषक गमावला असला तरी, टीम इंडिया टी-20 विश्वचषक नक्कीच जिंकेल.

त्यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा भावूक झाले होते. वर्ल्ड कप पराभवानंतर जय शाह यांनी रोहितच्या कर्णधारपदावर कोणतेही स्टेटमेंट दिले नव्हते. त्यांच्या शांत राहण्याबद्दल चर्चा सुरू होती.

या वर्षीच्या सुरवातीला जय शाह यांनी आपले मौन सोडले व त्यांनी भाकीत केले होते. ते म्हणाले होते,

अखेर मी विश्वचषकातील पराभवावर विधान देत आहे. 2023 मध्ये, आम्ही सलग 10 सामने जिंकूनही ट्रॉफी उचलू शकलो नव्हतो, परंतु आम्ही मन जिंकले. मी सर्वांना वचन देऊ इच्छितो की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये भारतीय ध्वज नक्कीच फडकवू.

जय शाह आपल्या ट्विट मध्ये म्हणाले होते, 'जरी मेन इन ब्लू वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले असले तरी त्यांचा वर्ल्डकपमधील प्रवास प्रेरणादायी आहे. दमदार कामगिरी ते पराभवाची सल! प्रत्येक सामन्यात आपल्या संघाचे जिद्द, दृढता आणि स्कील सर्व पणाला लागलं होतं. सर्व 10 सामने जिंकून फायनल खेळणे.. त्यांनी खरं क्रिकेट दाखवलं. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.

संपूर्ण देश आपल्या संघाच्या पाठीशी आहे. वर्ल्डकपचे रूपांतर देशभरात उत्सवात झाले. ज्या उर्जेने, पॅशनने संपूर्ण देशाने खंबीर पाठिंबा दिला तो जबरदस्त होता.'

अखेर जय शाह यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. भारताने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तिरंगा झेंडा बार्बडोसच्या मैदानात रोवला.

2022 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत होता, परंतु त्यावेळी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रोहितच्या रडण्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर 2024 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून त्या पराभवाचा बदला घेतला. या मॅचनंतरही रोहित रडताना दिसला, पण फरक इतकाच की मागच्या वेळी तो निराशेने रडताना दिसला होता आणि यावेळी तो अभिमानाने रडताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT