Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs USA: भारत - अमेरिका सामन्यात पावसाचा येणार व्यत्यय? जाणून घ्या कसं असेल न्यूयॉर्कचं हवामान

T20 World Cup 2024: भारत आणि अमेरिका संघात बुधवारी सामना होणार आहे, या सामन्यादरम्यान न्युयॉर्कमधील वातावरण कसं राहिल, जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs USA: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बुधवारी भारत आणि अमेरिका संघात सामना होणार आहे. हा सामना न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता, तर स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता चालू होणार आहे.

दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. भारताने या स्पर्धेत आयर्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. तसेच अमेरिकेने या स्पर्धेत कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित आहेत.

त्यामुळे या दोन्ही संघांनी सुपर-8 फेरीसाठी दावेदारी ठोकलेली आहे. त्याचमुळे या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

दरम्यान, न्युयॉर्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारीही भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे बुधवारी न्युयॉर्कमधील हवामान कसे असेल, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला असेल.

Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार न्युयॉर्कमध्ये दिवसा हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण काहीसे ढगाळ राहू शकते. त्याचबरोबर उनसावलीचा खेळही दिसू शकतो.

एकूणच या वातावरणामुळे आणि स्थानिक वेळेनुसार सामना सकाळी होणार असल्याने खेळपट्टी ताजी असेल, ज्याचा फायदा गोलंदाजांना होऊ शकतो.

असे आहेत संघ

  • भारत - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • अमेरिका - स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), अँड्रिज गॉस, ऍरोन जोन्स, नितीश कुमार, कोरे अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, अली खान, निसर्ग पटेल, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शेडली व्हॅन शाल्कविक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT