India Vs Pakistan Tickets  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK T20 WC 2024 : भारत - पाकिस्तान सामन्याची तिकीटे सोल्ड आऊट नाहीच; काय आहे कारण?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Tickets : भारत - पाकिस्तान सामना हा आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना असतो. या सामन्यावेळी स्टेडियम खचाखच भरलेलं असतं मग सामना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो.

यंदाच्या टी - 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत - पाकिस्तान सामना हा 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. मात्र अजूपर्यंत या सामन्याची सर्व तिकीटे विकली गेलेली नाही. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आयसीसीच्या वेबसाईटवर भारत - पाकिस्तान सामन्याचे तिकीट अजूनही उपलब्ध आहे. मात्र या तिकीटाची किंमत इतकी जास्त आहे की ते अनेकांच्या बजेटच्या बाहेर आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यात खुर्च्या रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. यामागे तिकीटाचे दर हे प्रमुख कारण आहे.

न्यूयॉर्कमध्ये तयार झालेल्या नव्या नसाऊ काऊन्टी क्रिकेट स्टेडियमवर भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता ही 34 हजार आसनांची आहे. भारतीय संघ आयर्लंड, युएसए आणि सराव सामना देखील याच मैदानावर खेळणार आहे. त्यानंतर कॅनडाचा सामना हा लौडेरहिल येथे होणार आहे.

तिकीट दर गगनाला भिडले

आयसीसी वेबसाईटनुसार भारत पाकिस्तान सामन्याची तिकीटे अजून सोल्ड आऊट झालेली नाहीत. ही तिकीटे अतून तीन पॅकेजमध्ये मिळत आहेत. डायमंड क्लब, प्रीमियम क्लब लाऊंज आणि कॉर्नर क्लब या पॅकेजमध्ये तिकीटे उपलब्ध आहेत.

डायमंड क्लब पॅकेज हे सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे. याचे तिकीट प्रती व्यक्ती जवळपास 8 लाख 34 हजार रूपये इतके आहे. याचबरोबर प्रीमियर क्लबजे तिकीट हे 2 लाख रूपये इतके आहे. या तिकीटाअंतर्गत प्रेक्षकांना बुफेट आणि बारची सुविधा मिळणार आहे. कॉर्नर क्लबचे तिकीट हे 2 लाख 29 हजार रूपये इतके आहे.

(Cricket News Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT