Ravindra Jadeja | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध टीम इंडियात बदलाची शक्यता, कुलदीपला खेळवण्यासाठी देणार जडेजाचा बळी?

India vs USA: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अमेरिका संघात सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs USA: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अमेरिका संघात सामना होणार आहे. हा सामना न्युयॉर्कच्या नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर-8 मधील स्थान पक्के करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करताना दिसतील. त्यातच न्युयॉर्कच्या या मैदानात वेगवान गोलंदाजांच्या वर्चस्व राहिल्याचे दिसले आहे.

तसेच अमेरिका संघ नवखा असला, तरी त्यांनी पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे या सामन्यात अमेरिकेला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. या सामन्यासाठी भारतीय संघ एक मोठा बदल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हा बदल म्हणजे रविंद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये वगळून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. भारताने सखोल फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या चारही अष्टपैलू खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले होते.

अक्षरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचीही संधी देण्यात आली होती. अशात भारतीय संघव्यवस्थापन पुढे वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या सामन्यांचा विचार करता कुलदीप यादवला संधी देऊन पाहू शकतात.

त्यातच त्याची डावखुरी फिरकी खेळणे अमेरिकेच्या फलंदाजांना कठीणही ठरू शकते. याचा विचार करता जडेजाला अमेरिकेविरुद्ध न खेळवण्याची जोखीम भारतीय संघ उचलू शकते.

जडेजा सध्या फलंदाजी करताना काहीसा संघर्ष करतानाही दिसत आहे. अशात जडेजा मॅच विनर खेळाडू असला, तरी संघ संयोजनाचा विचार करता त्याला प्लेइंग इलेव्हनमधील जागा गमवावी लागू शकते.

भारतीय संघव्यवस्थापनाने जडेजाला जरी वगळले, तरी विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि अक्षर पटेल असे खेळाडू फलंदाजीसाठी पर्याय आहेत. त्याचमुळे संघव्यवस्थापन जडेजाला वगळण्याची जोखीम घेणार का हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, भारत आणि अमेरिका संघात बुधवारी होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT