Nepal Fan Jumps into Swimming Pool in Stadium Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

BAN vs NEP: जरा हटकेच! कर्णधार रोहितने विकेट घेताच चाहत्याची थेट स्टेडियममधील पुलमध्ये उडी, पाहा Video

Fan Jumps into Swimming Pool: टी20 वर्ल्ड कप सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट पडताच नेपाळच्या चाहत्याने स्टेडियममधील पुलमध्येच उडी मारल्याचे दिसले.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, Bangladesh vs Nepal: क्रिकेट विश्वात गेल्या अनेक महिन्यांपासून नेपाळच्या चाहत्यांची चर्चा आहे. सध्या चालू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही नेपाळ संघाच्या चाहत्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या संघाला त्यांनी उत्फुरतपणे पाठिंबा दिला आहे. असाच उत्साह टी20 वर्ल्डकपमधील त्यांच्या अखेरच्या सामन्यातही दिसला आहे.

नेपाळने सोमवारी (17 जून) बांगलादेशविरुद्ध सेंट विन्सेंट येथे टी20 वर्ल्ड कप 2024 मधील अखेरचा सामना खेळला. या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवत सुपर-8 मध्ये स्थान मिळवले आहे. पण याच सामन्यात एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.

झाले असे की सहाव्या षटकात नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने चौथ्या चेंडूवर बांगलादेशच्या तौहिद हृदोयला 9 धावांवर बाद केले. हृदोयचा झेल संदीप लामिछानेने पकडला.

या विकेटचा आनंद स्टेडियममध्ये असलेल्या नेपाळच्या चाहत्याला इतका झाला की त्याने स्टेडियममधील पाण्याने भरलेल्या पुलमध्ये नेपाळचा झेंडा हातात धरत आंनंदाने उडी मारली. त्यानंतरही तो पाण्यातून बाहेर येत सेलीब्रेशन करताना दिसला . हा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला असून तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर बांगलादेशने दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 19.2 षटकात 85 धावांवरच सर्वबाद झाला. नेपाळकडून कुशल मल्ला (27), दिपेंद्र सिंग ऐरे (25) आणि असिफ शेख (17) या तिघांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमानने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शाकिब अल हसनने 2 विकेट्स, तर तस्किन अहमदने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वबाद 106 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन (17), महमुद्दुलाह (13), रिषाद हुसैन (13), तस्किन अहमद (12), जेकर अली (12) आणि लिटन दास (10) यांनी दोन आकडी धावा केल्या. मात्र, कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

नेपाळकडून गोलंदाजी करताना सोमपाल कामी, दिपेंद्र सिंग, रोहित पौडेल आणि संदीप लामिछाने या सर्वांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT