Pakistan Cricket team X/ICC
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: आयर्लंडने घाम फोडला, पण शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने विजयासह प्रतिष्ठा राखली; आफ्रिदी ठरला मॅचविनर

Pakistan vs Ireland: पाकिस्तान संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध विजय मिळवत शेवट गोड केला आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Pakistan vs Ireland: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या फेरीतील अ गटाचे सामने रविवारी (16 जून) संपले. रविवारी या गटातील अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात फ्लोरिडाला पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 3 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला.

या दोन्ही संघांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते. त्यामुळे दोन्ही संघ प्रतिष्ठेसाठी हा सामना खेळत होते.

या सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 18.5 षटकात 7 विकेट्स गमावत 111 धावा करून पूर्ण केला.

पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि साईम आयुब यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही दोघांनी सलग दोन षटकात विकेट्स गमावल्या.

यानंतर मात्र आयर्लंडच्या बॅरी मॅककार्थी आणि कर्टिस कॅम्फरने पाकिस्तानला मोठे धक्के दिले. त्यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पाकिस्तानची मधली फळी कोलमडली. एकाक्षणी पाकिस्तानची अवस्था 6 बाद 62 धावा अशी झाली होती.

परंतु, नंतर एक बाजू सांभाळत असलेल्या बाबर आझमला अब्बास आफ्रिदीने चांगली साथ दिली. या दोघांनी भागीदारी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ पोहचवलं होतं. पण अब्बास आफ्रिदीने 14 चेंडूत 12 धावांची गरज असताना 17 धावांवर विकेट गमावली.

मात्र त्यानंतर आलेल्या शाहिन आफ्रिदीने 19 व्या षटकात 2 षटकार ठोकले आणि पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विजयी षटकार मारला. आफ्रिदी 5 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला. तसेच बाबर आझमने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली.

आयर्लंडकडून गोलंदाजीत बॅरी मॅककार्थीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच कर्टिस कॅम्फरने 2 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडेअर आणि बेंजामिन व्हाईट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी आयर्लंड संघ प्रथम फलंदाजीला उतरले होते. आयर्लंडने 20 षटकात 9 बाद 106 धावा केल्या. पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीने आयर्लंडला मोठे धक्के दिले होते. त्याने पहिल्याच षटकात अँड्र्यु बलबिर्नी आणि लोर्कन टकर यांना माघारी धाडलं, तर तिसऱ्या षटकात हॅरी टेक्टरलाही शुन्यावर बाद केले. त्या धक्क्यातून आयर्लंड संघ सावरला नाही.

तरी नंतर गॅरेथ डेलानी आणि जोशुआ लिटिल यांनी केलेल्या खेळीमुळे आयर्लंडला 100 धावांचा टप्पा पार करता आला. डेलानीने 31 धावांची खेळी केली. तसेच जोशुआ लिटिलने नाबाद 22 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त जॉर्ज डॉकरेल (11) आणि मार्क एडेअर (15) यांनाच दोन आकडी धावा पार करता आल्या.

पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच इमाद वासिमनेही 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद अमीरने 2 विकेट्स घेतल्या, तर हॅरिस रौफने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT