Pakistan Cricket Team  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Pakistan Cricket Team : सब का हिसाब होगा! कॅप्टन बाबर पासून निवडसमितीपर्यंत; पीसीबी देणार सगळ्यांनाच डच्चू?

T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत पीसीबीने दिले आहे. अनेकांवर कारवाई होणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket Board T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा संघ कधीही आपल्या सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जात नव्हता. पाकिस्तानी चाहत्यांना संघाच्या कामगिरीतील चढ उताराची आता सवय झाली होती. मात्र टी 20 वर्ल्डकप 2024 मधील पाकिस्तानची अत्यंत खराब कामगिरी त्यांच्या चाहत्यांसाठी एक शॉक होता.

त्यांना पहिल्यांदाच ग्रुप स्टेजमधून गाशा गुंडाळावा लागला होता. आपला पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या युएसएने पाकिस्तानचा पराभव करत त्यांना मोठा धक्का दिला होता. हाच पराभव पाकिस्तानच्या घरवापसीला कारणीभूत ठरला.

पाकिस्तान संघाच्या या वाईट कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोडमध्ये आली असून ते कोणावरच दया माया दाखवण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीयेत.

बाबरवर टांगती तलवार?

पीसीबीची पहिली अॅक्शन ही निवडसमितीविरूद्ध होण्याची शक्यता आहे. काही महिन्यापूर्वीच नियुक्त झालेली संपूर्ण निवड समितीच पीसीबी बर्खास्त करण्याची शक्यता आहे. सध्याच्या निवडसमिती मधील किमान सहा सदस्यांना तरी घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

पाकिस्तान वर्ल्डकपनंतर बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याच मालिकेत पीसीबी आपल्या संघात अनेक प्रयोग करणार आहे. मात्र प्रामुख्यानं निवडसमितीवर सर्वात मोठी कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. सध्याच्या निवडसमितीत 9 सदस्य आहेत.

अब्दुल रझाक, मोहम्मद युसूफ आणि कर्णधार बाबर आझम हे पीसीबीच्या रडारवर आहेत. टीकाकारांनी निवडसमितीच्या कार्यक्षमतेवरच टीका केली होती. तब्बल 9 सदस्यांच्या निवडसमितीवर अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे संपूर्ण निवड समितीच बर्खास्त केली जाऊ शकते.

संपूर्ण नवी सुरूवात?

पाकिस्तान क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, 'पीसीबी सध्याची निवडसमिती बर्खास्त करण्याचा विचार करत आहे. पीसीबी यानंतर नवीन छोटी निवडसमिती स्थापन करण्याची शक्यता आहे. सध्याची निवडसमिती लवकरच जॉबलेस होणार आहे.'

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना त्यांची टीम निदान फाईट करताना पाहायची आहे. निवडसमितीत स्पष्टता आणि क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना प्रोत्साहन मिळायला हवं.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT