IND vs PAK T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : आमचं हॉटेल बदलून द्या! पीसीबीनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीला भरला दम

India Vs Pakistan; Change our hotel! PCB told ICC before the match against India: आमचं हॉटेल बदलून द्या! पीसीबीनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीला भरला दम...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK T20 World Cup 2024 : भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी पीसीबीने पुन्हा एकदा नाटक करण्यास सुरूवात केली आहे. पीसीबीने आता आयसीसीकडे त्यांचे हॉटेल बदलण्याची मागणी केली आहे.

आयसीसीने पाकिस्तानचे हॉटेल हे मॅच व्हेन्यूपासून दूर आहे. आयसीसीने सुरक्षेचा विचार करून पाकिस्तानचे हॉटेल हे दूर ठेवले आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याकडे खूप गांभाऱ्याने पाहिलं जातं. त्यामुळं पाकिस्तान संघाला त्यांच्याच सुरक्षेसाठी लांबच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

पीसीबीच्या मागणीनंतर आता आयसीसीने पाकिस्तानचा संघाला नासाऊ स्टेडियमपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबवण्यात येणार आहे. पाकिस्तानचा संघ न्यूयॉर्कमध्ये 9 जूनला भारताविरूद्ध खेळणार आहे तर 11 जूनला कॅनडाविरूद्ध त्यांचा सामना याच मैदानावर होणार आहे. सध्या पाकिस्तानचा संघाचे हॉटेल हे 90 मिनिटाच्या अंतरावर आहे.

आयसीसीकडे हॉटेलवरून तक्रार करणारा पाकिस्तान हा एकमेव संंघ नाहीये. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ देखील हॉटेलवरून नाराज होते. भारतीय संघाने यापूर्वीच नासाऊ स्टेडियमपासून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हॉटेल बूक केलं आहे.

पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर झमान, हारिस रौऊफ, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम आयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT