Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: धोनी, कपिल अन् गांगुलीच्या यादीत आता रोहितनंही मिळवला मान; पाहा भारताचे ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांची यादी

Rohit Sharma: रोहित आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा चौथा कर्णधार ठरला, आत्तापर्यंत हा मान कोणाला मिळालाय जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC Tournaments: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) इतिहास रचला. बार्बाडोसला झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

त्यामुळे रोहित शर्मा एमएस धोनीनंतर टी२० वर्ल्ड कप जिंकणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला. धोनीच्या नेतृत्वात २००७ साली भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच रोहित भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकणारा चौथाच कर्णधार ठरला. धोनी आणि रोहितपूर्वी भारताने कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात आयसीसीची विजेतीपदं जिंकली आहेत.

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिला-वहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २००२ साली भारताने गांगुलीच्या नेतृत्वात विभागून चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. त्यावेळी अंतिम सामन्यात पाऊस पडल्याने भारत आणि श्रीलंका या संघांना विभागून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते घोषित करण्यात आले होते.

यानंतर धोनीच्या नेतृत्वात २००७ साली टी२० वर्ल्ड कप, २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या विजेपदांना भारताने गवसणी घातली. यानंतर तब्बल ११ वर्षांनी पुन्हा एकदा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप जिंकत सहाव्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.

भारतीय वरिष्ठ संघाची आयसीसी विजेतीपदं

  • १९८३ - कपिल देव (वनडे वर्ल्ड कप)

  • २००२ - सौरव गांगुली (चॅम्पियन्स ट्रॉफी विभागून)

  • २००७ - एमएस धोनी (टी२० वर्ल्ड कप)

  • २०११ - एमएस धोनी (वनडे वर्ल्ड कप)

  • २०१३ - एमएस धोनी (चॅम्पियन्स ट्रॉफी)

  • २०२४ - रोहित शर्मा (टी२० वर्ल्ड कप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT