KL Rahul
KL Rahul  Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

युवीनंतर अशी कामगिरी करणारा लोकेश राहुल ठरला दुसरा भारतीय फलंदाज

सुशांत जाधव

स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलची धमाकेदार कामगिरी

KL Rahul hits second fastest T20I fifty Record : दुबईच्या मैदानात स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार खेचले. टीम इंडियाने स्कॉटलंडच्या संघाला अवघ्या 86 धावांत रोखले होते. या धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुलने गौतम गंभीर याचा 19 चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मागे टाकला. षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मार्क वॉटच्या गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा युवराज सिंगच्या नावे आहे. पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवीने एका षटकात सहा षटकार मारत सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. त्याने अवघ्या 12 चेंडूत विश्वविक्रम प्रस्थापित केला असून तो अद्यापही अबाधित आहे.

सर्वात जलद अर्धशतक झळकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. सौदी अरेबियाच्या फैजल खानने 2019 मध्ये कुवेत विरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 2018 मध्ये वेस्ट इंडीजचा शाई होप याने बांगलादेश विरुद्ध 16 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. मागील वर्षी सिंगापूर संघाचा टिम डेविड याने मलेशियाविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. लोकेश राहुलने वर्ल्ड कप स्पर्धेतील स्कॉटलंड विरुद्ध अर्धशतकासाठी 18 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT