Team India Dressing Room | Fielding Medal BCCI
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG: द्रविडने दिलं फिल्डिंग मेडल अन् जडेजानं थेट उचलूनच घेतलं, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील BTS Video पाहिला का?

Fielding Medal: टी20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये फिल्डिंग मेडल देण्याचा सोहळा पार पडला, यावेळी खेळाडू मजा-मस्ती करताना दिसले. तसेच जडेजाने द्रविडला उचलूनही घेतले होते.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने गुरुवारी (20 जून) अफगाणिस्तानविरुद्ध सुपर-8 सामन्यात 47 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रथेप्रमाणे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड करत त्याला फिल्डिंग मेडल देण्यात आले. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

2023 वनडे वर्ल्ड कपपासून भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये सामन्यातील किंवा मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला ड्रेसिंग रुममध्ये मेडल देण्याची प्रथा सुरू झाली आहे. तिच प्रथा सध्या सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही कायम ठेवण्यात आली.

दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर नेहमीप्रमाणे भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी भारतीय खेळाडूंनी केलेल्या शानदार क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सरावादरम्यान केलेल्या गोष्टींचा सामन्यात फायदा झाल्याचेही म्हटले.

त्यानंतर दिलीप यांनी या सामन्यात फिल्डिंग मेडल जिंकण्यासाठी ४ उमेदवारांची नावे घोषित केली. यामध्ये त्यांनी आधी अर्शदीप सिंगचे नाव घेत त्याने दाखवलेल्या जागरुकतेबद्दल कौतुक केले. तसेच दुसरे नाव त्यांनी रविंद्र जडेजाचे घेतले. त्याच्या कौशल्याबद्दल आणि अचूकतेबद्दल त्याचं कौतुक करण्यात आलं.

यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक करत तिसरा उमेदवार म्हणून अक्षर पटेलचे नाव घेण्यात आले. यावेळी अक्षरच्या चेहऱ्यावर आश्चर्याच्या भाव होते. त्याचे हे भाव पाहून विराट कोहलीला त्याचे हसू आवरता आले नाही. अखेरचे नाव दिलीप यांनी यष्टीरक्षक रिषभ पंतचे घेतले.

यानंतर त्यांनी हे मेडल एक स्पेशल व्यक्ती देणार असल्याचे सांगताना थोडी गंमतही केली आणि सांगितले की ती स्पेशल व्यक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे नाव घेत तो हे मेडल देणार असल्याचे सांगितले.

द्रविडही हसत उभा राहिला आणि त्याने या मेडलचा विजेता म्हणून जडेजाची घोषणा करत त्याच्या गळ्यात मेडल घातले. यानंतर जडेजानेही आनंदाने त्याला उचलून घेतले. यावेळी अन्य भारतीय संघातील खेळाडूही जल्लोष करताना दिसले.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध जडेजाचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले होते. त्याने डीपला क्षेत्ररक्षण करताना दोन झेल घेतले, त्याचबरोबर त्याने काही धावाही वाचावल्या.

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ही टी20 वर्ल्ड कप स्पर्धा राहुल द्रविडची भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेरची स्पर्धा आहे.

भारताचा विजय

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या होत्या. त्यानंतर 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकात सर्वबाद 134 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT