Rohit Sharma | India vs Ireland | T20 World Cup Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: रोहितचा टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम; विराट-बाबरच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध 26 वी धाव पूर्ण करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Pranali Kodre

Rohit Sharma Record: बुधवारी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात सामना झाला. न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात आयर्लंडने भारतासमोर 97 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने 6 व्या षटकात 26 वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम विराट कोहली आणि बाबर आझम यांनीच केला आहे.

विशेष म्हणजे रोहितने याच सामन्यात बाबर आझमलाही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मागे टाकले आहे.

त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर हे तीन खेळाडू असून सध्या चालू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही खेळत आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये या तीन खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी शर्यत असणार आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 5 जून 2024 पर्यंत)

  • 4038 धावा - विराट कोहली (118 सामने)

  • 4026 धावा - रोहित शर्मा (152सामने)

  • 4023 धावा - बाबर आझम (119 सामने)

  • 3591 धावा - पॉल स्टर्लिंग (143 सामने)

  • 3531 धावा - मार्टिन गप्टील (122 सामने)

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे आयर्लंडने पहिली फलंदाजी केली. परंतु, आयर्लंडला प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात सर्वबाद 96 धावा करता आल्या होत्या. आयर्लंडकडून सर्वाधिक 26 धावा गॅरेथ डेलेनीने केल्या.

भारताकडून गोलंदाजीत हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT