Rishabh Pant sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : पंतची एकाच षटकात एकहाती षटकारबाजी

पंतने कर्णधाराला उत्तम साथ देत चौथ्या विकेटसाठी 53 धावांची खेळी केली.

सुशांत जाधव

T20 World Cup, India vs Pakistan : भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या लढतीनं टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात केलीये. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीला शाहिन आफ्रिदीनं स्वस्तात तंबूत धाडले. हसन अलीने सुर्यकुमारच्या रुपात संघाला तिसरा धक्का दिला.

भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या 31 धावा असताना आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. एका बाजूने पडझड सुरु असताना दुसऱ्या बाजूला कर्णधार विराट कोहली तग धरून मैदानात उभा राहिला. पंतने कर्णधाराला उत्तम साथ देत चौथ्या विकेटसाठी 53 धावांची खेळी केली. 30 चेंडूत 39 धावांची बहुमूल्य खेळी करुन पंत झेलबाद झाला. शबदाब खानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात त्याने विकेट फेकली.

आपल्या अल्प आणि महत्वपूर्ण खेळीत पंतने दोन खणखणीत चौकारासह दोन उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. भारतीय डावातील 12 व्या षटकातील हसन अलीच्या दुसऱ्या चेंडूवर एका हाताने त्याने खेळलेले फटका सीमारेषेबाहेर जाऊन पडला. या षटकारावर शांत बसेल तो पंत कसला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने एका हाताने चेंडू सहा धावांसाठी सीमारेषेबाहेर मारल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT