Ravi Shastri BCCI Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

सामना पाक-वेस्ट इंडिजचा अन् मैदानाबाहेर उभे रवी शास्त्री!

विराज भागवत

तुम्हाला माहित्ये का नक्की काय घडलं?

T20 World Cup: विश्वकरंडक स्पर्धेत रविवारी भारत पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. भारतीयांसाठी पाकिस्तानचा सध्याचा संघ परिचित नसल्यामुळे त्यांचा सराव सामना आवर्जून पाहण्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्य अधिकारी मैदानाबाहेर उपस्थित होते. दुबई क्रिकेट अकादमीत क्रिकेटची दोन मोठी मैदाने एकमेकांना लागून आहेत. एका मैदानावर भारताचा इंग्लंडविरुद्ध सराव सामना होता; तर दुसऱ्या मैदानावर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होता. या वेळी शास्त्री आणि त्यांच्या कोचिंग स्टाफने सामन्याची रेकी केली.

भारतीय खेळाडू आपल्या सामन्यासाठी मैदानात आले, तेव्हा पाकिस्तानचा सामना सुरू होता. वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. त्यांचे १३१ धावांचे आव्हान पाकिस्तानचा संघ पार करत असताना भारतीय खेळाडू तेथे आले आणि आपल्या सामन्याची तयारी करण्यापूर्वी शास्त्री आणि काही खेळाडूंनी पाकिस्तानची फलंदाजी पाहण्यावर भर दिला. पाकिस्तानच्या संघाबाबत आम्हाला फारशी माहिती नाही. त्यांच्याविरुद्ध रविवारी सामना खेळायचा असल्यामुळे आता त्यांचा खेळ पाहणे आम्ही पसंत केले, असे भारताच्या एका खेळाडूने सांगितले.

या सामन्याचे सोशल मीडियावर प्रक्षेपण होत होते. त्या वेळी मैदानाबाहेर उपस्थित असलेले भारतीय प्रशिक्षक आणि खेळाडूंचे लगेचच चित्रीकरण झाले आणि ही छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्धही झाली.

'रेकी' करत असलेल्यांमध्ये रवी शास्त्री, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर प्रामुख्याने दिसून येत होते. भारतीय टीम रेकी'साठी येथे आली तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता. आझमने या सामन्यात अर्धशतकही केले. पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर त्यांची काही भारतीय खेळाडूंबरोबर नजरानजर झाली; परंतु कोणताही संवाद झाला नाही. भारतीय खेळाडू लगेचच आपल्या सामन्यासाठी बाजूच्या मैदानावर गेले.

पाक मार्गदर्शकांशी शास्त्री यांची भेट

भारतीय खेळाडू आपल्या सामन्यासाठी लगेचच दुसऱ्या मैदानात रवाना झाले असले, तरी रवी शास्त्री यांनी पाकिस्तान संघाचे मार्गदर्शक फिल सिमंस आणि मॅथ्यू हेडन यांची भेट झाली. या तिघांचे एकत्रित छायाचित्र पाकिस्तान क्रिकेट मंडळानेच सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले. हेडन हे पाकिस्तान मार्गदर्शक टीममध्ये नव्याने दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT