Virat-Smith-Williamson
Virat-Smith-Williamson 
क्रिकेट वर्ल्ड कप

भारत, ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंड.. वाचा काय म्हणाला शेन वॉर्न

विराज भागवत

टी२० वर्ल्ड कपआधी वॉर्नचं महत्त्वाचं विधान

T20 World Cup 2021: भारतीय संघाने आधी इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया अशा तुल्यबळ संघांना सराव सामन्यांमध्ये धूळ चारली. मूळ स्पर्धेआधी भारताने दोन सराव सामने खेळले. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १९व्या षटकात तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १८व्या षटकात विजय मिळवला. आता भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील सलामीचा सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याने महत्त्वाचं विधान केलं.

Shane-Warne

"मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखलं जातंय. त्यांच्याकडे अनेक मॅचविनर्स आहेत. पण आताच्या क्षणाला भारत आणि इंग्लंड हेच टी२० वर्ल्ड कपच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याची भावना चाहत्यांच्या मनात आहे. न्यूझीलंडचा संघ ICC च्या स्पर्धेत नेहमीच चांगली कामगिरी करतो. या साऱ्यांबरोबत पाकिस्तान आणि विंडिजच्या संघातही चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे नेमका कोणता संघ विजेता ठरतो, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे", असं मत शेन वॉर्नने व्यक्त केलं.

चांगल्या लयीत नसलेल्या फलंदाजांच्या बाबतीतही त्याने आपलं मत मांडलं. "डेव्हिड वॉर्नर किंवा इयॉन मॉर्गन या दोन खेळाडूंचा सध्याचा फॉर्म वाईट आहे याची साऱ्यांनाच कल्पना आहे. पण त्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची टीका केली जातेय त्याला काहीच अर्थ नाही. चाहत्यांनी एक लक्षात ठेवायला हवं की लय (Form) ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. पण दर्जा (Class) हा अनंतकाळासाठी असतो. (Class is Permanent Form is temporary) हे दोघेही अतिशय प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे याच दोघांपैकी एखादा खेळाडू स्पर्धेच्या अखेरीस सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला तर आश्चर्य वाटून घेऊ नका", असंही वॉर्नने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

HSC Result 2024 : १२ वी निकाल येण्याआधी पालकांनी या गोष्टी नक्की कराव्यात, मुलांना आधार मिळेल

Bigg Boss Marathi: प्रतीक्षा संपली! मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा, यंदा महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

SCROLL FOR NEXT