Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: रोबो वॉक करत हिटमॅनने उचलली ट्रॉफी, जय शाहसकट सगळे स्टेजवरून पळाले; टीम इंडियाचं भन्नाट सेलिब्रेशन Video

Rohit Sharma Celebration: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उचलल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह भन्नाट सेलिब्रेशन केलं.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: २९ जून २०२४... भारतीय क्रिकेट इतिहासात कायमस्वरुपी ही तारीख लक्षात ठेवली जाईल. याच दिवशी म्हणजे शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

शनिवारी बार्बाडोसच्या मैदानात झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं. यासह टी२० वर्ल्ड कप उंचावला.

दरम्यान, रोहित शर्मा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा दुसराच कर्णधार ठरला. इतकंच नाही, तर २००७ साली जेव्हा भारताने धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा रोहित खेळाडू म्हणून त्या संघाचा भागही होता. त्यामुळे तो दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्व भारतीय खेळाडूंना विजेपदाचे मेडल्स देण्यात आले. यानंतर रोहित कर्णधार म्हणून मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलल्यानंतर ट्रॉफी घेण्यासाठी पोडियमवर येत होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह त्याला ट्रॉफी देण्यासाठी संघातील इतर खेळाडूंसह तिथे उभे होते.

याचवेळी रोहितने अनोखी कृती केली. तो रोबो सारखी अॅक्शन करत ट्रॉफी घेण्यासाठी आला. यावेळी त्याची ही कृती पाहून सर्वच जण हसायला लागले. दरम्यान, जय शाह यांनी ट्रॉफी रोहितकडे सोपवल्यानंतर मात्र इतर आधिकाऱ्यांसह स्टेजवरून लगेचच खाली पळाले. कारण भारतीय संघाला ट्रॉफीसह सेलिब्रेशन करायचे होते.

ही ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशनही केले. काही खेळाडू नाचले, तर तर उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही त्याचं अनोखं सेलिब्रेशन केलं. ही ट्रॉफी जिंकत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट आणि रोहित यांनीही एकत्र तिरंगा पाठीवर घेत फोटो काढले.

तसेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने टी२० वर्ल्ड कप भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये नेला. द्रविडचाही प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा टी२० वर्ल्ड कल ठरला.

या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT