Team India Practice Training New York T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कच्या 'या' गावात टीम इंडियाने ठोकला मुक्काम! उपकर्णधार पांड्याबाबत आली अपडेट

Team India Practice Training New York T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे जवळपास सर्व खेळाडू न्यूयॉर्कला पोहोचले आहेत.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Update : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे जवळपास सर्व खेळाडू न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. पहिल्या बॅचमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश होता.

टीम इंडियाला 1 जूनला सराव सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या संघात सामील झाला आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून चाहत्यांना टीममध्ये सामील झाल्याची माहिती दिली आहे.

या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहे. आयपीएलचा लीग टप्पा संपल्यानंतर हार्दिक लंडनला गेला होता. अशा परिस्थितीत त्याने संघासोबत प्रवास केला नाही. दुसरीकडे, विराट कोहली अद्याप संघात सामील झालेला नाही.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूयॉर्कमध्ये होणारे सामने या शहरातील नासो काउंटीमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाला येथे ग्रुप स्टेजमधील 4 पैकी 3 सामने खेळायचे आहेत.

अशा स्थितीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच मैदानाजवळ आपला मुक्काम ठोकला आहे. भारतीय संघ नासो काउंटीमधील गार्डन सिटी या मोठ्या गावात मुक्कामी आहे. खरे तर हे गाव एखाद्या छोट्या शहरापेक्षा कमी नाही. त्याची लोकसंख्या 23 हजारांहून अधिक आहे.

टीम इंडियाला आपला एकमेव सराव सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.

यानंतर टीम इंडिया 5 जूनला ग्रुप स्टेजचा पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सामना होणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया ग्रुप स्टेजचे शेवटचे दोन सामने अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध खेळणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT