Hardik-Pandya-Son 
क्रिकेट वर्ल्ड कप

Video: जेव्हा हार्दिकचा मुलगा मुलाखतीच्या मध्येच येतो...

विराज भागवत

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय

युएईमध्ये रंगलेला IPL चा हंगाम अखेर संपला आणि आता T20 World Cup ची धूमा सुरू झाली आहे. भारतीय संघाचे दोन सराव सामना आज आणि २० तारखेला होणार आहेत. त्यानंतर थेट २४ तारखेला भारत विरूद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या जातात हे चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही. अशीच एक मुलाखत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची सुरू होती. त्यावेळी त्याचा मुलगा थेट मुलाखती दरम्यान आला आणि त्याने धमाल केली.

BCCI ने एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या एक मुलाखत देत होता. त्याच वेळी त्याचा मुलगा अगस्त्य मुलाखतीच्या मध्येच आला. गोंडस अगस्त्य आपल्या बाबांना शोधत शोधत हार्दिक पर्यंत पोहोचला आणि बाबांशी गप्पा मारू लागला. मग हार्दिकने त्याच्या मुलाला छानपैकी समजावलं. इतकेच नव्हे तर हार्दिकची मुलाखत घेणाऱ्या माणसांनीही अगस्त्यशी झकास गप्पा मारल्या.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, हार्दिक गेल्या काही दिवसांपूर्वी एक शस्त्रक्रियेमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला तंदुरूस्तीसाठी वेळ देण्यात आला. तो पूर्णपणे फिट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले. IPL सुरू होण्याआधीच विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला होता. त्यात त्याला संघात स्थान देण्यात आले. पण IPL मध्ये हार्दिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुख्य मुद्दा म्हणजे त्याने एकही चेंडू गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT