Virat Kohli T20 World Cup 2024 Final  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

T20 World Cup 2024 Final : विराट कोहलीने जेव्हा भारताचा डाव गडगडला त्यावेळी त्याला टेकू दिला अन् नंतर मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत धावगती वाढवली.

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IND vs RSA T20 WC 24 Final : टी 20 वर्ल्डकपमध्ये 7 सामन्यात 75 धावा करणाऱ्या विराट कोहलीची अखेर फायनलमध्ये बॅट तळपली. भारताची अवस्था 3 बाद 34 धावा अशी झाली असताना डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. त्यानं हे अर्धशतक ठोकण्यासाठी 48 चेंडू घेतल्या. मात्र त्यानंतर त्यानं आपला गिअर बदलला. विराटनं या अर्धशतकासोबतच एक मोठा माईल स्टोन गाठला. त्याचं हे टी 20 वर्ल्डकपमधील 6 नॉक आऊट सामन्यातील पाचवे अर्धशतक आहे.

विराट कोहलीचे हे टी 20 वर्ल्डकप 6 नॉक आऊट सामन्यातील पाचवे अर्धशतक ठोकले.

  • - 2014 च्या टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये विराटने 44 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या.

  • - 2014 च्या टी 20 वर्ल्डकप फायनलमध्ये त्याने 58 चेंडूत 77 धावा केल्या.

  • - 2016 च्या टी 20 वर्ल्डकप सेमी फायलनमध्ये 47 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या.

  • - 2022 च्या टी 20 वर्ल्डकप सेमी फायलनमध्ये 40 चेंडूत 50 धावा केल्या.

  • - 2024 च्या टी 20 वर्ल्डकप फायलनमध्ये 59 चेंडूत 78 धावा केल्या.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची बॅट शांत होती. मात्र ज्यावेळी भारताला गरज होती त्यावेळी किंग कोहलीकडून मोठी खेळी आली. फायनलमध्ये रोहित बाद झाल्यानंतर पॉवर प्लेमध्ये धावांची गती वाढवण्याची जबाबदारी विराटवर होती. त्यानं आपल्या इनिंगचीच सुरूवात दोन चौकारांनी केली होती. मात्र अक्षर पटेल आल्यानंतर विराटची इनिंग संथ झाली.

अक्षरने मात्र आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. त्यानंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केलं अन् गिअर बदलला. त्याच्या 59 चेंडूत केलेल्या 76 धावांमुळे भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली.

रोहित शर्माने सेमी फायनल झाल्यावर विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना त्याच्यावर विश्वास दर्शवला होता. त्याचा फॉर्म ही चिंतेची बाब नाही. त्यानं आपला सर्वोच्च गेम हा फायनलसाठी राखून ठेवला आहे असं रोहित म्हणाला होता. विराटने हा त्याचा विश्वास फायलनमध्ये सार्थ ठरवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT