Wasim Akram | Pakistan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Pakistan Cricket:'बस्स झालं, देशाच्या भावनांचा सत्यानाश केला, टीमच बदला...', पाकिस्तान संघावर वसीम अक्रम भडकला; Video Viral

India vs Pakistan: पाकिस्तान संघाला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध 120 धावांचे लक्ष्यही पार करता न आल्याने पाकिस्तान संघावर वसीम अक्रम चांगलाच संतापला होता.

Pranali Kodre

Wasim Akram: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेत मंगळवारी कॅनडाविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. पण त्याआधी पाकिस्तानला अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

भारताविरुद्ध रविवारी (९ जून) झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलागही यशस्वीरित्या करता आला नव्हता. पाकिस्तानला संघाला २० षटकात ७ बाद ११३ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात मोहम्मद रिझवानने ४४ चेंडूत सर्वाधिक ३१ धावा केल्या होत्या.

दरम्यान, या सामन्यात विजय आवाक्यात असतानाही पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम आपल्याच देशाच्या संघावर प्रचंड संतापला होता. त्याने पाकिस्तान संघावर तिखट शब्दात टीका केली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूबरोबर अक्रम बोलत होता. यावेळी अक्रम म्हणाला की आता नवा पाकिस्तान संघ उभारण्याची गरज आहे. त्याने म्हटले लढण्याची वृत्ती कोणीही आणू शकत नाही, ती अंगातच पाहिजे. यांना चांगले पैसेही मिळतात.

तसेच अक्रम म्हणाला, पाकिस्तानला कोणी पराभूत केलं नाही, तर ते स्वत:च पराभूत झाले आहेत. खेळाडूंना १० वर्षांच्या आसपास खेळण्याचा अनुभव आहे, तरी त्यांना सामन्याची परिस्थिती समजून घेता येत नाहीये.

यावेळी सिद्धूने अक्रमला पूर्वीच्या पाकिस्तान संघाची आठवणही करून दिली. तसेच पूर्वी अक्रमच्या गोलंदाजीची किती धास्ती असायची याबद्दलही आठवण करून दिली.

अक्रम म्हणाला, 'खूप झालं आता, खूप पाठीशी घातलं. आता हे व्हायरल झालं, तरी चालेल. कोणीतरी पाकिस्तान क्रिकेटबद्दल खरं बोलायला हवा. कारण हे सर्व हाताबाहेर चालले आहे.'

याशिवाय अक्रमने पाकिस्तान संघात सध्या फुट पडल्याचाही इशारा दिला आहे. तो म्हणाला, 'कोणाचा मूड ऑफ आहे, तर त्याला याच्याशी बोलायचं नाही, याला त्याच्याशी बोलायचं नाही. कमऑन, काय चाललंय हे. पूर्ण देशाच्या भावनांचा यांनी सत्यानाश केला आहे. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.'

तो म्हणाला, 'आता पुरे झालं. नवीन पोरांना आणा, नवा पाकिस्तान संघ तयार करा. पाकिस्तानमध्ये असलेले लोक आणि इथे असलेले पाकिस्तानीही निराश आहेत. भारताविरुद्ध बऱ्याच काळानंतर जिंकण्याचा आनंद ते साजरा करत होते, पण पाकिस्तान संघ म्हणाला, आम्हाला जिंकायचेच नाही.'

'त्यांनी जाऊन आरशात पाहायला पाहिजे आणि त्यांनीच आता खेळायला नको असं म्हणाला पाहिजे. माझा हाच सल्ला असेल की नवा संघ तयार करा. आत्ताही हरत आहात, नव्या संघ घेऊनही एखादवर्ष हराल, पण नव्या खेळाडूंना तयार करता येईल.'

यावर सिद्धूही पाकिस्तान संघाबाबत बोलताना म्हणाले बिचारे बनू नका, सहानुभूती घेऊन खेळू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT