Wasim Jaffer memes Social Media
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : सेमी फायनलमधील रंगत दाखवणारी जाफरची 'धमाल' मीम्स

दोन्ही गटातील सेमी फायनलमधील चुरस दाखवून देण्यासाठी जाफरने शेअर केली भन्नाट मीम्स

सुशांत जाधव

भारताचा माजी क्रिकेटर वासीम जाफरने (Wasim Jaffer) टी 20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतील सेमीफायनलसाठीची गुंतागुत दाखवून देणारे एक मीम्स शेअर केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाफर नेहमीच भन्नाट प्रतिक्रिया देत असतो. सुपर 12 मधील दोन्ही गटातील सेमी फायनलमधील चुरस दाखवून देण्यासाठी जाफरने बॉलिवूडमील 'धमाल' चित्रपटातील विनोदी मीम्स शेअर केली आहे.

जाफर ने 'कू' अ‍ॅपच्या माध्यमातून सुपर-12 मध्ये दोन्ही गटातील संघांना आपल्या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागणार असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. टीम इंडियासाठी अफगाणिस्तानने तर ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंडने सामना जिंकण्याची आवश्यकता आहे.

सुपर 12 च्या पहिल्या गटात इंग्लंडचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या गटातून पाकिस्तानच्या संघाने सेमी फायनल गाठली आहे. सध्याच्या घडीला पहिल्या गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका तर दुसऱ्या गटातून न्यूझीलंड आणि भारतीय संघ यांच्यात चुरस आहे.

ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय नोंदवून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालावर लक्ष्य ठेवायचे आहे. दुसरीकडे भारतीय संघाला नामिबिया विरुद्धच्या सामन्यातील विजयासह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील निकालावर लक्ष ठेवून रहावे लागणार आहे.

युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 मधील लढती अखेरच्या टप्प्यात आहेत. 7 नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना टीम इंडियाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय टीम इंडियाचे सेमी फायनलचे दरवाजे उघडू शकतो. या लढतीनंतर सेमी फायनलमधील चार संघ फिक्स होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT