Suryakumar Yadav | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: सूर्यानं ज्या कॅचनं वर्ल्ड कप जिंकवला, त्याचा ड्रेसिंग रुममध्ये जय शाह यांच्याकडून खास सन्मान, पाहा Video

Suryakumar Yadav: टी२० वर्ल्ड कप भारताला जिंकून देण्यासाठी सूर्यकुमारने घेतलेला एक झेल खूप महत्त्वाचा ठरला. त्याबद्दल जय शाह यांच्याकडून ड्रेसिंग रुममध्ये त्याचं विशेष कौतुक झालं.

Pranali Kodre

Fielding Medal: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने शेवटपर्यंत अपराजित राहत विजेतेपदाला गवसणी घातली. शनिवारी बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंना विजेत्यांचे मेडल देण्यात आले.

या सामन्यानंतर प्रथेप्रमाणे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग मेडल देण्यात आले. सामना संपल्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वजण जल्लोष करत होते. यावेळी भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी खेळाडूंचं कौतुक केलं.

तसेच त्यांनी सांगितलं की यावेळी फिल्डिंग मेडल देण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित आहे. दरम्यान, यावेळी या मेडलसाठी उमेदारांची घोषणा न करताच सूर्यकुमार यादवला य मेडलचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं.

जय शाह यांनी त्याच्या गळ्यात ते मेडल घातलं. यानंतर सूर्यकुमारने दिलीप यांचे आणि जय शहा यांचे आभार मानले. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सूर्याने या सामन्यात अखेरच्या षटकात जेव्हा दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती, तेव्हा हार्दिकच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईनवर महत्त्वाचा झेल घेतला होता. हा झेल सामना पलटवणारा ठरला.

जर हा झेल त्याने घेतला नसता, तर तो षटकार गेला असला आणि निकाल भारताच्या विरुद्धही लागू शकला असता. त्याचमुळे त्याचा हा झेल महत्त्वाचा होता.

या सामन्यात भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT