USA's captain Monank Patel | T20 World Cup Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

USA vs PAK: अमेरिकेसाठी धोनीसारखी भूमिका निभावणारा कोण आहे मोनंक पटेल? पाकिस्तानविरुद्ध ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

T20 World Cup 2024: पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेने टी20 वर्ल्ड कपमधील सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला, या विजयात कर्णधार मोनंक पटेलनेही मोलाचा वाटा उचलला.

Pranali Kodre

Who is Monank Patel: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत गुरुवारी (6 जून) अमेरिका क्रिकेट संघाने मोठा उलटफेर केला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला सुपर ओव्हरमध्ये ५ धावांची पराभवाचा धक्का दिला. अमेरिकेच्या या विजयात कर्णधार मोनंक पटेलचाही महत्त्वाचा वाटा राहिला, त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

मोनंकने या स्पर्धेपूर्वीच इतर संघांना इशारा दिला होता की त्याचा संघ मोठे धक्के देऊ शकतो. त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अमेरिकेचा संघ सध्या खेळत देखील आहे.

अनेक वर्षे धोनीने भारतासाठी ज्याप्रमाणे यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून भूमिका निभावली आहे, त्याचप्रमाणे मोनंकही अमेरिका संघाचे यष्टीरक्षक आणि कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

दरम्यान, मोनंकने त्याच्या नेतृत्वानेही अनेकांना प्रभावित केले आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारल्यानंतर गोलंदाजीत चांगले बदल केले. तसेच अमेरिकेच्या गोलंदाजांना त्यांच्या क्षेत्ररक्षकांनीही चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 159 धावांवरच रोखले.

यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिका संघाने सलामीवीर स्टीव्हन टेलरची विकेट लवकर गमावली होती, परंतु नंतर मोनंकने अँड्रिस गुसबरोबर 68 धावांची भागीदारी करत अमेरिकेच्या विजयाचा पाया रचला होता. त्याने गुस बाद झाल्यानंतर अर्धशतकही झळकावलं.

अखेर त्याच्या अडथळा मोहम्मद अमीरने बाद केले. पण तोपर्यंत त्याने अमेरिकेला भक्कम पाया रचून दिला होता. त्याने 38 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावांची खेळी तेली. त्यानंतर ऍरॉन जोन्स आणि नितीश कुमार यांनी अमेरिकेला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात 20 षटकात 3 बाद 159 धावांपर्यंत पोहचवल्याने सामना बरोबरीत सुटला.

यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने दिलेल्या 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तान करत असताना सौरभ नेत्रावळकर गोलंदाजी करत होता.

त्यावेळी सौरभ एका क्षणी थोडा दबावात आल्यासारखा वाटत असताना मोनंक त्याच्याकडे जाऊन त्याचे मनोबल वाढवताना दिसला होता. एकूणच मोनंकने या सामन्यात निभावलेली भूमिका अमेरिकेच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली.

कोण आहे मोनंक पटेल?

31 वर्षीय मोनंकचा जन्म 1 मे 1993 साली गुजरातमध्ये झाला. त्याने गुजरातकडून वयोगटातील क्रिकेटही खेळले आहे. पण नंतर 2016 साली तो अमेरिकेत स्थायिक झाला. यानंतर 2019 मध्ये त्याचे अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले.

त्यान अमेरिकेसाठी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आत्तापर्यंत 47 वनडे आणि 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 1446 धावा केल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 507 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Chardham Yatra 2026: १४९ दिवसांनंतर भाविकांसाठी उघडले बद्रीनाथ धामचे कपाट! २५ क्विंटल फुलांनी सजले मंदिर

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT