Rohit Sharma | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: रोहितने टी20 वर्ल्ड कप विजयानंतर का चाखलेली खेळपट्टीवरील माती? स्वत:च केला खुलासा; पाहा Video

T20 World Cup 2024: रोहित शर्माने टी२० वर्ल्ड कप विजेतेपदानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव चाखली होती. पण त्याने ही कृती का केलेली, यामागील कारण सांगितले आहे.

Pranali Kodre

Why Rohit Sharma eat soil of Pitch: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले. शनिवारी (२९ जून) बार्बाडोसच्या केन्सिंगटन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले आणि दुसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.

त्यामुळे रोहित शर्मा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा दुसराच कर्णधार ठरला.

विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा भावूक झाल्याचे दिसले होते. त्याने आनंदाच्या भरात खेळपट्टीवरील मातीचीही चव चाखल्याचे दिसले होते. त्याच्या या कृतीने अनेकांना टेनिसपटू नोवाक जोकोविचची आठवण करून दिली होती. जोकोविचही विम्बल्डन जिंकल्यानंतर मैदानातील गवताची चव चाखतो.

दरम्यान, रोहितने खेळपट्टीवरील माती का चाखली, याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की त्याने याबद्दल काही ठरवले नव्हते, जे केलं ते भावनेच्या आणि आनंदाच्या भरात त्याने केले.

बीसीसीआयने रोहित शर्माच्या वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतच्या फोटोशुटवेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने जिंकल्यानंतरच्या भावना आणि त्याच्या माती चाखण्याबद्दल खुलासा केला आहे.

रोहित म्हणाला, 'काहीच ठरवून केलं नव्हतं, ते जे मी केलं तर अचानक वाटलं म्हणून केलं.मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. कारण त्या खेळपट्टीने आम्हाला टी२० वर्ल्ड कप दिला. आम्ही या खेळपट्टीवर आणि या मैदानात खेळलो.'

'माझ्या हे मैदान आणि ही खेळपट्टी आयुष्यभरासाठी लक्षात राहिल. त्यामुळे मला माझ्याबरोबर त्याची आठवण न्यायची होती. ते क्षण खूप खूप खास होते. या ठिकाणी आमचं स्वप्न पूर्ण झालं. मला या क्षणाची आठवण हवी होती. हीच भावना त्या कृतीमागं होती.'

तसेच पुढे रोहित म्हणाला, 'ती भावना खरंच अविस्मरणीय आहे. अजूनही आम्ही त्या भावना जगत आहोत. सामना संपल्यापासून ते आत्तापर्यंत, या खूप मस्त भावना आहेत. हे स्वप्नच असल्यासारखं वाटत आहे. जरी हे घडलं असलं, तरी त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. याचाच अनुभव येत आहे.'

'आम्ही याबद्दल स्वप्न पाहिलं होतं, एक संघ म्हणून खूप दिवसांपासून मेहनत घेतली होती. आता खूप हायसं वाटत आहे, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेता आणि अखेरीस तुम्हाला ती मिळते, तेव्हा खूप खूप छान वाटतं.'

याशिवाय रोहितने असंही सांगितलं की खेळाडूंनी रात्री उशीरापर्यंत सेलीब्रेशन केलं, त्यामुळे झोपही नीट झालेली नाही. रोहित म्हणाला, 'काल रात्री आम्ही चांगला वेळ घालवला. पहाटेपर्यंत टीममेट्सबरोबर सेलीब्रेशन केलं. त्यामुळे मी म्हणेल की माझी नीट झोप झालेली नाही, पण ठीक आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर झोप न मिळणं ठिकच आहे. आता घरी जाऊन झोपण्यासाठी खूप वेळ आहे.'

दरम्यान, रोहित २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचाही भाग होता. त्यामुळे दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT