Todd Murphy, Scott Boland in India A Squad Sakal
Cricket

ऋतुराज गायकवाड India A टीमला लीड करणार; ऑस्ट्रेलियाने जाहीर केला संघ, जो आपल्या पठ्ठ्याला आव्हान देणार

India A tour of Australia: भारत अ संघ ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील भारताविरुद्धच्या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सोमवारी जाहीर झाला आहे.

Pranali Kodre

Australia A Squad for Match against India A: भारताचा राष्ट्रीय संघ नोव्हेंबरमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधी भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अ संघाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व नॅथन मॅकस्विनीकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टसह ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय कसोटी संघात स्थान मिळवू शकणाऱ्या काही संभावित खेळाडूंनाही निवडण्यात आले आहे. यामध्ये स्कॉट बोलंड, मार्क हॅरिस, टॉड मर्फी, जोश फिलिप असे काही खेळाडू आहेत.

मात्र, अद्याप ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा झालेली नाही. परंतु, महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड भारतीय अ संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीही बीसीसीआय निवड समितीने त्याला इराणी कप स्पर्धेत शेष भारत संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवली होती.

त्याने त्याआधी दुलीप ट्रॉफीमध्येही भारत क संघाचे शानदार नेतृत्व केले होते. त्याचबरोबर अशीही चर्चा आहे की भारतीय संघ व्यवस्थापन ऋतुराजकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तिसरा सलामीवीर म्हणून पाहत आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी त्याला तपासून पाहण्यासाठी त्याच्याकडे भारत अ संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ संघात ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान मॅके येथे पहिला सामना होईल, तर दुसरा सामना मेलबर्नला ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया अ संघ
नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बॉलँड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कोनोली, ऑली डेव्हिस, मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पेअर्सन, जोश फिलिप, कोरी रोचीसिओली, मार्क स्टीकेटी, ब्यू वेबस्टर

ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचीही घोषणा

दरम्यान, भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ मायदेशात पाकिस्तानविरुद्ध ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. यातील वनडे मालिकेसाठीही ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे.

या संघात विश्रांतीनंतर आता पॅट कमिन्सचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच मार्कस स्टॉयनिसचेही संघात पुनरागमन झाले आहे.

या संघात ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, ऍडम झाम्पा, मिचेल स्टार्क हे अनुभवी खेळाडूही आहेत. जॅक फ्रेझर-मॅकगर्कलाही संधी मिळाली आहे. मात्र, दुखापतीमुळे कॅमेरॉन ग्रीन या मालिकेला मुकणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ॲबॉट, कूपर कोनोली, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT