Pakistan Cricket Team Sakal
Cricket

PAK vs ENG Test: पाकिस्तानला शहाणपण सुचलं! बाबर आझम, शाहिन आफ्रिदीला संघातून हाकललं

Pakistan Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी संघातून बाबर आझम आणि शाहिन आफ्रिदीला वगळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

Pakistan Test Squad: पाकिस्तान क्रिकेट संघाची सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला साडेपाचशे धावा केल्यानंतरही डावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या निवड समितीने अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यांना कसोटी संघातून वगळलं आहे. नसीम शाहलाही संघात संधी देण्यात आलेली नाही.

मात्र, कर्णधार शान मसूदला संघात कायम करण्यात आले आहे. मसूदने पहिल्या सामन्यात दीडशतकी खेळी केली असली तरी त्याच्या नेतृत्त्वावर शंका उपस्थित होत होत्या.

बाबर आझम गेल्या अनेक दिवसांपासून फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत आहे. त्याने २०२२ पासून कसोटीत एकही शतक केलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने ३० आणि ५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सध्या त्याच्यावर टीका होत आहे.

अखेर आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तसेच शाहिन आणि नसीम यांनाही गोलंदाजीत फारशी चमक गेल्या काही दिवसांपासून दाखवता आलेली नाही.

दरम्यान पाकिस्तानच्या निवड समिती सदस्य आकिब जावेद यांनी सांगितले की बाबर, शाहिन, नसीम आणि सर्फराज अहमद यांना विश्रांती दिली आहे. पण याबरोबर त्यांनी असंही सांगितले की १६ जणांचा संघ निवडताना सध्याचा फॉर्मही लक्षात घेण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर या खेळाडूंना दिलेल्या विश्रांतीमुळे त्यांना पुन्हा फिटनेस, आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आणि पुढच्या आव्हानांसाठी तयार होण्यासाठी वेळ मिळेल.

दरम्यान, पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना १५ ऑक्टोबरपासून मुलतानला सुरु होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना २४ ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे सुरु होईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT