Bacchu Kadu vs Sachin Tendulkar esakal
Cricket

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

अनिरुद्ध संकपाळ

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar Online Rummy : प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या एका बॉडीगार्डने आत्महत्या केली होती. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने ऑनलाईन रम्मीच्या व्यसनापोटी आपलं जीवन संपवलं असा दावा केला आहे. याचबरोबर त्यांनी सचिन तेंडुलकरवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करत असल्यावरून पुन्हा टीका केली.

बच्चू कडू म्हणाले की, 'जो व्यक्ती आयुष्यभर सचिन तेंडुलकरची सुरक्षा करत होता. त्यानं आपले जीवन ऑनलाईन रम्मीमुळं आज संपवलं. याच ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सचिन तेंडुलकर करतो. हे निषेध करण्यासारखं आणि राग येणारंच आहे. सचिनने ऑनलाईन रम्मीची जाहिरात करणं थांबवावं किंवा त्यानं भारत रत्न परत करावा. जर त्यानं असं केलं नाही तर आम्ही 6 किवा 7 जूनला त्यांच्याविरूद्ध आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचं दहन करू.'

बच्चू कडूने पहिल्यांदाच सचिनविरूद्ध आंदोलन केलेलं नाही. यापूर्वी देखील सचिनने ऑनलाईन रम्मीचं प्रमोशन केल्याचा आरोप करत बच्चू कडूंनी त्यांच्याविरूद्ध आंदोलन केलं होतं. बच्चू कडू पुढे म्हणाले की, 'सचिनची कायम सुरक्षा करणारा बॉडीगार्डने सचिन जाहिरात करत असलेल्या ऑनलाईन रम्मीपोटी आपला जीव गमावला. जर अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या जाहिरीतामुळं अशी दुःखत घटना घडत असेल तर हे देशाचं दुर्दैवच आहे.'

सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड प्रकाश कापडे हे राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी होते. त्यांनी जामनेर येथील आपल्या राहत्या घरी 15 मे रोजी स्वतःवर गोळी झाडून घेत आपलं जीवन संपवलं होतं. त्यांनी एसआरपीएफमध्ये 15 वर्षे काम केलं. ते यापूर्वी छगन भुजबळ आणि नाराणय राणे यांच्या सुरक्षेत तैनात होते. त्यानंतर ते सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराच्या सुरक्षेत तैनात होते. पोलिसांनी प्रकाश कापडे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT