BCCI Australia and England cricket boards in talks to revive Champions League T20 News Marathi
BCCI Australia and England cricket boards in talks to revive Champions League T20 News Marathi  sakal
क्रिकेट

Champions League T20 : टी-20 चा थरार आणखी वाढणार...! 10 वर्षांपूर्वी बंद झालेली लीग BCCI पुन्हा सुरू करणार?

Kiran Mahanavar

Champions League Twenty20 : इंडियन प्रीमियर लीगच्या यशानंतर सध्या जगभरात अनेक टी-20 क्रिकेट लीग खेळल्या जात आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याबरोबरच खेळाडू या लीगमध्येही भाग घेतात.

दरम्यान, तुम्हाला आठवत आहे का... काही वर्षाआधी चॅम्पियन्स लीग आयोजित करण्यात आली होती, जी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जात होती. मात्र, काही कारणास्तव ती थांबवण्यात आली. पण आता बातम्या येत आहेत की, चॅम्पियन्स लीग स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकते. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्ड एकमेकांशी बोलत आहेत.

सुमारे दहा वर्षांपूर्वी चॅम्पियन्स लीग बंद झाली होती. 2014 मध्ये शेवटचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 3 आयपीएल संघांनी यात भाग घेतला होता. आणि अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, अखेरीस सीएसकेने बाजी मारली.

त्या वर्षी भारताचे तीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक संघ यात सहभागी झाला होता. चॅम्पियन्स लीगचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळवला जाणार होता, परंतु तो रद्द करण्यात आला.

त्यानंतर 2009 ते 2014 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले. या काळात एकूण 6 हंगाम खेळले गेले. त्यापैकी 4 भारतात आणि 2 दक्षिण आफ्रिकेत झाले. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने दोन वेळा विजेतेपद पटकावले, तर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्सने एकदा जेतेपद पटकावले आहे.

2014 पासून आत्तापर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षांत आणखी अनेक देशांतर्गत टी-20 लीग सुरू झाल्या आहेत. दरम्यान, PTI च्या हवाल्याने बातमी समोर आली आहे की, क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स म्हणाले की अशा व्यस्त क्रिकेट कॅलेंडरमध्ये चॅम्पियन्स लीगसाठी विंडो तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

ते पुढे म्हणाले की, त्यावेळी टी-20 क्रिकेट फारसे खेळले जात नव्हते, पण आता खेळले जाते. आणि आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ईसीबी आणि बीसीसीआय ते पुन्हा सुरू करण्याबाबत बोलत आहेत. हे शक्य आहे की पहिली चॅम्पियन्स लीग महिला क्रिकेटमध्ये असेल, ज्यामध्ये WPL, द हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगमधील संघ खेळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT