Gautam Gambhir BCCI  ESAKAL
Cricket

Gautam Gambhir : बीसीसीआयने साधला संपर्क; गौतम गंभीर होणार द्रविडचा उत्तराधिकारी?

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir BCCI Head Coach : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकाची जागा गंभीरने घ्यावी यासाठी बीसीसीआयने गौतम गंभीरशी संपर्क साधला आहे. या बाबातची माहिती इएसपीएन क्रिकइन्फोने दिली आहे. राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ हा जूनमधील टी 20 वर्ल्डकपनंतर संपणार आहे.

राहुल द्रविडने बीसीसीआयला तो भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची दुसरी टर्म घेण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले. दरम्यान, गौतम गंभीरला आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणताही अनुभव नाही. मात्र त्यानं दोन आयपीएल फ्रेंचायजींचे प्रशिक्षकपद भुषवलं आहे.

गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा 2022 आणि 2023 च्या हंगामात मेंटॉर होता. दोन्ही हंगामात लखनौने प्ले ऑफ गाठली होती. त्यानंतर गंभीरनं केकेआरकडे वळला. तो या हंगामात केकेआरचा मेंटॉर म्हणून काम करतोय. केकेआरने यंदाच्या हंगामात अव्वल स्थान मिळवत प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

गंभीर हा भारताच्या 2007 च्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू आहे. त्याचबरोबर त्यानं 2011 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने केकेआरचे नेतृत्व करताना दोनवेळा आयपीएल टायटल जिंकून दिले.

केकेआरने 2012 आणि 2014 च्या हंगामात विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 च्या चॅम्पियन्स लीग टी20 स्पर्धेत देखील अंतिम फेरीत धडक मारली होती.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT