BCCI Action Manoj Tiwary Marathi News sakal
Cricket

BCCI Action Manoj Tiwary : रणजी ट्रॉफीबाबत भाष्य केल्याप्रकरणी क्रीडा मंत्र्यावर BCCIने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

BCCI Action Manoj Tiwary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीवर मोठी कारवाई केली आहे.

Kiran Mahanavar

BCCI Action Manoj Tiwary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीवर मोठी कारवाई केली आहे. खरे तर काही दिवसांपूर्वी मनोज तिवारीने रणजी ट्रॉफी बंद करण्याची मागणी केली होती.

सध्या भारतात रणजी ट्रॉफीही खेळली जात आहे. मनोज तिवारी रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचा कर्णधार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मनोज तिवारीने बीसीसीआयला रणजी ट्रॉफी थांबवण्याची विनंती केली. मनोज तिवारी यांच्या मते रणजी करंडक स्पर्धेची क्रेझ सातत्याने कमी होत असून या स्पर्धेत खूप सुधारणा करण्याची गरज आहे.

बीसीसीआयने मनोज तिवारीला दंड ठोठावला

बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीला रणजी ट्रॉफीसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे महागात पडले आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मनोज तिवारीवर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने ठोठावलेल्या दंडाचा खुलासा खुद्द मनोज तिवारीने केला आहे. याआधी मनोज तिवारीने X वर एक पोस्ट शेअर करत पुढच्या मोसमापासून रणजी ट्रॉफी थांबवावी, असे लिहिले होते. रणजीमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे. रणजी ट्रॉफीची चमकही कमी होत असल्याने मी निराश झालो आहे.

इतकंच नाही तर रणजी ट्रॉफीची घसरण आणि आयपीएलची वाढती क्रेझ याबाबत मनोज तिवारी म्हणाले की, त्यांच्या टीकेचा या निर्देशावर परिणाम झाला असावा, ज्याचा उद्देश रणजी ट्रॉफीपेक्षा आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या इशान किशनसारख्या खेळाडूंवर दबाव आणणे हा आहे. आजकाल युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटपेक्षा लहान फॉरमॅटच्या स्पर्धांना अधिक प्राधान्य देत असल्याचे मनोज तिवारीचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा पटल्यास भाजपात प्रवेश करेन- संजय राऊत

अल्फाच्या सेटवर आलियाच बॉबी देओलसोबत खरंच भांडण झालेलं? अभिनेता खुलासा करत म्हणाला....'त्यावेळी अनेक गोष्टींकडे मी...'

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

SCROLL FOR NEXT