Team India Head Coach News sakal
Cricket

Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

Team India Head Coach News : भारतीय क्रिकेट संघ लवकरच 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन कोचची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Kiran Mahanavar

Team India Head Coach : भारतीय क्रिकेट संघ लवकरच 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन कोचची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, परंतु त्यांचा कार्यकाळ जूनपर्यंत आहे. अशा स्थितीत टीम इंडिया आतापासूनच मुख्य कोचच्या शोधात आहे, जेणेकरून वेळेत योग्य व्यक्तीची या पदासाठी निवड करता येईल. अलीकडेच, एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपपर्यंत वाढवला होता.

कार्यकाळ आणि पगार किती असेल?

बीसीसीआयने आपल्या जाहिरातीत कोचसाठी अटी स्पष्ट केल्या आहेत. यानुसार, नवीन प्रशिक्षकाला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल, जो 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर कार्यकाळ संपेल. जोपर्यंत पगाराचा प्रश्न आहे, बोर्डाने याबाबत उमेदवारांशी बोलणी करणार असून अनुभवाच्या आधारे वेतन निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने ठेवल्या अटी

  • उमेदवाराने किमान 30 कसोटी सामने किंवा 50 एकदिवसीय सामने खेळलेले असावेत.

  • किंवा किमान 2 वर्षे पूर्ण सदस्य टेस्ट खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असावा.

  • किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही देशाच्या अ संघाचा 3 वर्षे प्रशिक्षक आहे.

  • किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक.

  • आणि वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.

निवड कशी होईल?

बोर्डाचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, बोर्ड मुख्य प्रशिक्षकासाठी नव्याने नियुक्ती सुरू करेल. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना पुन्हा ही भूमिका हवी असेल तर तो अर्जही करू शकतो, असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. प्रशिक्षकाच्या निवडीसाठी, बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती म्हणजेच CAC सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेते आणि नंतर त्यांची शिफारस बोर्डाकडे पाठवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पावसाचा जोर वाढणार! मुंबई-कोकणला ऑरेंज, रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट; पुढील 24 तास अतिधोक्याचे

LNG Supply: दिलासादायक बातमी! केंद्र सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली; भारतावर काय परिणाम होणार?

Suryakumar Yadav: अरे अच्छा तो चल रहा है...भारताच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचा VIDEO व्हायरल

विमानातही होणार इथेनॉल आधारित फ्युएलचा वापर, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

Marathi Live Updates : राम मंदिर चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन

SCROLL FOR NEXT